Pune Pimpri Chinchwad Crime News | अमावस्या, पोर्णिमेला देवाला अंडी, सिगारेट, दारुचा नैवैद्य; मुलासाठी सुनेचा छळ, जादुटोणा कायद्याखाली पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नात हुंडा दिला नाही म्हणून छळ करुन मुलगा व्हावा, यासाठी सुनेला दर अमावस्या, पोर्णिमेला हातात धागा बांधून देवपुजा करण्यास लावत. देवाला अंडी, सिगारेट, दारुचा नैवद्य दाखवण्यास सांगितला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुपा पोलिसांनी मध्यस्थ तसेच हिंजवडीतील फॉर्मासिटिकल कंपनीत (Pharmaceutical Company Hinjewadi) काम करणार्‍या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मोरगाव येथे राहणाया एका २५ वर्षाच्या महिलेने सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती अभिजित शरद शेजवळ, सासरे शरद रघुनाथ शेजवळ, सासु सुनिता शरद शेजवळ, दीर रवींद्र शरद शेजवळ (सर्व रा. सुरभी बंगला, चैत्रबन, नवी सांगवी) आणि मध्यस्थ वामन मेरुकर (रा. सासवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अभिजित शेजवळ यांचा २६ डिसेबर २०२१ रोजी मोरगाव येथील सिद्धीविनायक मंगळ कार्यालयात विवाह झाला होता. अभिजित शेजवळ हा हिंजवडी येथील जिनोबा फॉर्मासिटिकल कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर एक महिना त्यांना चांगली वागणुक दिली. त्यानंतर २८ जानेवारी २०२२ पासून फिर्यादी यांना उपाशी ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तुझ्या घरच्यांनी लग्नात हुंडा कमी दिला. लग्न साधेसुधे करुन दिली. साखरपुड्यात बसण्यासाठी खुर्चीसुद्धा नव्हत्या.

आमचा मानपान सुद्धा व्यवस्थित केला नाही, असे म्हणून फिर्यादी यांचा छळ केला जाऊ लागला. घरात अमावस्या, पौर्णिमेला सतत सासु, सासरे, दीर व पतीकडून घरातील देवपुजा करण्यास लावून हातात धागा बांधणे, लाल फडक्यात लिंबु सोबत ठेवण्याची जबरदस्ती केली. फिर्यादी यांना या गोष्टी मान्य नव्हत्या. तुला मुल होत नाही़ हे केले नाही तर मुल होणार नाही, असे म्हणून देवघरात अंडी, सिगारेट, दारु यांचा नैवद्य दाखविण्यास सांगत असे. तसे न केल्यास सासरे दीर अंगावर धावून येत असे. तुझा पायगुण चांगला नाही तुझ्यामुळे आमच्या घरात वारंवार वाद होतात असे बोलून धमकावित असत. फिर्यादी या ११ सप्टेबर २०२२ रोजी माहेरी मोरगाव येथे गेल्या असता त्यांनी सर्व प्रकार वडिलांना सांगितला.

त्यानंतर त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे समुपदेशासठी अर्ज दिला होता.
परंतु पती केवळ एकदा समुपदेशनासाठी उपस्थित राहिले.
फिर्यादी यांचा १८ डिसेबर २०२३ रोजी वाढदिवस असल्याने पती अभिजित शेजवळ याने त्यांना औंध येथील हॉटेलमध्ये बोलविले.
तेथे वाढदिवसाचा केक कापल्यावर त्याने तु तुझे घरु पैसे घेऊन ये असे सांगितले.
त्यावर फिर्यादी यांनी माझे घरच्यांकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर अभिजित हा शिवीगाळ करु लागला.
तेव्हा त्यांनी गळ्यातील मंगळसुत्र व अंगठी काढून दिली.
त्यानंतर अभिजित शेजवळ हे फिर्यादी यांना म्हणाले की, मला आता तुझेसोबत रहायचे नाही तु मला आता घटस्फोट दे,
असे म्हणून दमदाटी करुन निघून गेले. त्यानंतर त्यांनी मध्यस्थी करणारे वामन मेरुकर यांना झालेला प्रकार सांगितला़.
तेव्हा त्यांनी उलट फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आता फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलीस निरीाक्षक नागनाथ पाटील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खुन प्रकरणात विठ्ठल शेलार व वाघ्या उर्फ रामदास मारणेला अटक

Kondhwa Khadi Machine Chowk | कोंढवा खडी मशीन चौक ते मंतरवाडी रस्ता 50 मी.चाच करणार

शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने चैन स्नॅचिंग, पर्वती पोलिसांकडून आरोपीला अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त