Pune Accident News | भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, चाकण-तळेगाव रोडवरील घटना

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला पाठीमागून धडक बसून दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात (Pune Accident News) चाकण-तळेगाव मार्गावरील (Chakan-Talegaon Road) सुदवडी गावच्या हद्दीत रविवारी (दि.21) दुपारी पावणे दोनच्या सुमारास झाला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

गणेश रामसिंग परदेशी (वय-27 रा. महाळुंगे, ता. खेड), रिंकू शारदा सिंग (वय-20) असे मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. याबाबत गणेश याचा चुलत भाऊ अनिल शंकर परदेशी (वय-33 सध्या रा. महाळुंगे ता. खेड मुळ रा. पिंपळगाव बु., ता. भडगाव जि. जळगाव) यांनी एमआयडीसी तळेगाव पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनावरील चालकावर आयपीसी 304अ, 279, 337, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ गणेश व त्याचा मित्र रिंकू हे दुचाकीवरुन चाकण येथून तळेगावला जात होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास सुदवडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने गणेशच्या दुचाकीला पाठिमागून जोरात धडक दिली. यामध्ये दोघेजण डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार व शरीराला किरकोळ मार लागून जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांना रुग्णवाहिकेतून तातडीने तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी दोघांना तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ताथवडे येथे बांधकाम साईटवर कामगाराचा खून, दोघांवर FIR