Pune Alandi Accident News | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणीचा जागीच मृत्यू; आळंदी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Alandi Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे. तर दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.14) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलच्या गेट समोर झाला. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Alandi Accident News)

नेहा पांडुरंग जोशी (वय-23 रा. मुलुंड चेक नाका, जनता विकास नगर, मुलुंड मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत महेश दत्तात्रय लोखंडे (वय-39 रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी गुरुवारी (दि.15) आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन MH 14 CP 3181 ट्रक चालकावर आयपीसी 304(अ), 279, 337, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश लोखंडे व नेहा जोशी हे दोघे मंगल साई इंजीनियरिंग प्रा. लि. कंपनीत
काम करतात. बुधवारी सायंकाळी ते दोघे कंपनीमधून दुचाकीवरुन (MH 14 LD 7225) राहत्या घरी आळंदी हनुमान वाडी
ते चाकण मार्गे जात होते. इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलच्या गेट समोर ते आले असता, आरोपीने त्याच्या ताब्यातील
ट्रक हयगयीने व निष्काळजीपणाने बेदरकारपणे भरधाव वेगात चालवून पाठीमागून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली.
यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या सोबत असलेली नेहा जोशी ही गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिसोदे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी