ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात

मुख्याधिकारी डोईफोडे आणि नगररचनाकार कस्तुरे यांच्यावर कारवाई

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी ५ लाख रुपयांची लाच घेताना नगररचनाकाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रंगेहाथ पकडले. अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब सिद्धेश्वर डोईफोडे Kakasaheb Siddheshwar Doifode (वय ३९) आणि नगररचनाकार अजय विजयकुमार कस्तुरे Ajay Vijaykumar Kasture (वय ५५, रा. मोतीनगर, लातूर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. (Latur ACB-Bribe Case)

याबाबत एका वकिलाने तक्रार केली होती. तक्रारदार यांची मरशीवणी येथे जमीन असून तिचा व्यावसायिक वापरासाठी प्राथमिक परवानगी मिळाली होती. अंतिम परवानगी मिळण्यासाठी त्यांनी अहमदपूर नगरपरिषदेकडे अर्ज केला. या कामासाठी त्यांनी नगररचनाकार कस्तुरे यांची भेट घेतली असता त्यांच्या व मुख्याधिकारी यांच्यासाठी ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. (ACB Trap Case)

त्यानुसार त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी ५ लाख रुपये आता देतो, २ लाख काम झाल्यावर देतो,
असे सांगितले. त्याला कस्तुरे यांनी संमती दर्शविली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नगरपरिषद कार्यालयाबाहेर
सापळा लावला. तक्रारदार हे त्यांच्या कारमध्ये बसवून होते. कस्तुरे हे खाली आले. त्यांनी कारमध्ये येऊन ५ लाख रुपये
घेऊन कार्यालयात जाताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ५ लाख रुपयांसह पकडले. त्यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे हे भक्तीस्थळ पाहणीसाठी गेले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी तेथे जाऊन डोईफोडे याला ताब्यात घेतले. अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime Branch News | नाशिक : एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात 10 वर्षे फरार असलेल्या सख्ख्या भावांना गुन्हे शाखेकडून अटक