Pune : चॅटींग अ‍ॅपद्वारे ओळख करुन तरुणाला लुटणारे अटकेत; कोंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – चॅटीग अ‍ॅप ( Chatig App )द्वारे ओळख करुन तरुणाला बोलावून मारहाण करुन लुटणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. इम्रान दस्तगीर सय्यद (वय २०, रा. कोंढवा खुर्द), मुफिज जलाल मुल्ला (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), उमेर उमर खान (रा. आलिफा टॉवर, कोंढवा) आणि फरदान ताबीश सय्यद (रा. शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलिसनामा ऑनलाईन ला सांगितले की यश बाबसाहेब सोनावणे या तरुणाला २९ मे रोजी मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अंमलदार पृथ्वराज पांडुळे, मोहन मिसाळ यांना बातमी मिळाली की, सोनावणे यांना लुटणारे मिठानगर भागातील संडे बाजार मैदानात थांबले आहेत त्यानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या सहकार्‍यांनी तेथे जाऊन इम्रान सय्यद व मुफिज मुल्ला यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांचा साथीदार उमेर खान हाही बरोबर असल्याचे समजले पोलिसांनी त्यालाही पकडले तिघांनाही अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची २ मे पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती.

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी सांगितले की , तपासादरम्यान चौकशीत फरदान सय्यद याने चॅटिंग अ‍ॅपद्वारे फिर्यादी याच्याशी संपर्क साधून त्याला बोलून घेतले सर्वांनी मिळून मारहाण करुन लुटल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी फरदान सय्यद याला अटक केली आहे. त्यांच्याकडून आरोपींनी चोरलेले मोबाईल फोनसह १ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कामगिरी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे ,कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद गुन्हे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, अभिजित रत्नपारखी, मोहन मिसाळ यांच्या पथकाने केली.

READ ALSO THIS :

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जिल्हा व नागरी बँकांच्या अस्तित्वासाठी टास्क फोर्स