महाराष्ट्र बँकेला दोन लाखांच्या नुकसान भरपाईचे आदेश 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे ग्राहक न्यायालयाने पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजीराव रोड वरील शाखेला तब्बल दोन लाख रुपये नुकसान भरपाई  देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि शाखेच्या मुख्य अधिकारी यांना याबाबतचे पत्र ग्राहक न्यायालयाकडून पाठवण्यात आले आहे. पुण्यातील महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महाराष्ट्र बँकेच्या विरोधात तक्रार नोंदवली होती.

अन् १६० नवऱ्यांनी घातले चक्क ‘जिवंत’ पत्नींच्या नावाने श्राद्ध!

महापालिकेत काम  करणाऱ्या राम मारुती भिसे यांनी ग्राहक  न्यायालयात २०१७ ला बँकेविरोधात तक्रार दाखल केली होती. ते पुण्यातील बिबवेवाडी येथील रहिवासी आहेत. जून २०१६ ते नोव्हेम्बर २०१६ या कालावधीत बँकेने भिसे यांना त्यांच्या खात्यावरील रक्कम काढू दिली नाही. भिसे हे नोकरदार आहेत. त्यामुळे त्यांचा महिन्याच्या महिन्याला पगार खात्यावर जमा होत होता. जून ते नोव्हेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. पैसे काढण्याबाबत बँकेला वारंवार विचारले असता त्यांनी क्षुल्लक कारणे सांगून या सहा महिन्याच्या कालावधीत खात्यावरील रक्कम भिसे यांना काढू दिली नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
आता व्हॉट्सअॅप स्टेट्स वरील व्हिडीओ करता येणार डाउनलोड

तक्रारदार भिसे यांनी ग्राहक न्यायालयाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात  जून २०१६ ते नोव्हेम्बर २०१६ दरम्यानच्या बँक स्टेटमेंटची प्रत जोडली आहे. यात देखील जून ते नोव्हेंबर या कालावधीत कोणतीही रक्कम पुणे महानगरपालिकेचे  कर्मचारी भिसे यांनी खात्यावरून काढलेली नाही असे सिद्ध होते. त्यामुळे बँकेने या कालावधीत भिसे यांना पैसे काढू दिले नाहीत ही बाब देखील स्पष्ट होते. त्यामुळे भिसे यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार कारवाई करीत ग्राहक न्यायालयाकडून महाराष्ट्र बँक बाजीराव रोड शाखेला २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 [amazon_link asins=’B07D11MDBS,B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8163991d-add4-11e8-a07c-dfb894d51b00′]
दरम्यान, बँकेने या प्रकरणाबाबत तक्रारीला आव्हान देण्याचा कोणाताही निर्णय घेतलेला नाही. ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शन कमिटीने तक्रारीची दाखल घेत  नोटीसची माहिती, अध्यक्ष व्ही. के. शिंदे आणि सदस्य क्षितिज कुलकर्णी यांच्या निर्णयानुसार नुकसान भरपाईचे आदेश  बँकेला देण्यात आले आहेत .