Pune Bharti Vidyapeeth Crime | धक्कादायक ! पुण्यातील प्रसिद्ध इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीने पेटवून घेतले, उपचारादरम्यान मृत्यू

कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला व रुममेटच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bharti Vidyapeeth Crime | पुण्यातील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका 19 वर्षाच्या विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेतले आहे. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला कंटाळून आणि रूममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीचे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना 7 मार्च रोजी घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Suicide Case)

रेणुका बालाजी साळुंके (वय 19) असे मृत्यु झालेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. तर या प्रकरणी हॉस्टेलमध्ये कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय 19) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बालाजी धोंडीबा साळुंखे (वय 49, रा. जेवळी, ता. लोहारा जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.(Pune Bharti Vidyapeeth Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी रेणुका ही भारती विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती.
होस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचारी सतीश जाधव हा रेणुकाला सारखे आय लव्ह यू असे मेसेज करत होता.
तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले, असे तो सारखा येता-जाता बोलत होता.
या सर्व प्रकारामुळे रेणुका घाबरली होती. तसेच हॉस्टलमध्ये तिची रुममेट मुस्कान सिद्धू ही देखील रेणुकाला अभ्यास करु
देत नव्हती. अभ्यास करत असताना रुम मधील लाईट बंद करत होती.

दोघांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांची मुलगी रेणुका हिने होस्टेलच्या बाथरुममध्ये 7 मार्च
रोजी रात्री नऊच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेतले. तिला तातडीने पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी
दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant-Ajit Pawar-Vijay Shivtare | अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा अपमान केला हे योग्य की अयोग्य यावर बोलणे उचित नाही; महायुती म्हणून विरोधकांशी दोन हात करताना एक पाउल मागे येण्याची तयारी ठेवावी लागेल