Uday Samant-Ajit Pawar-Vijay Shivtare | अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा अपमान केला हे योग्य की अयोग्य यावर बोलणे उचित नाही; महायुती म्हणून विरोधकांशी दोन हात करताना एक पाउल मागे येण्याची तयारी ठेवावी लागेल

शिवसेना नेते उदय सामंत यांचा विजय शिवतारे यांच्याबाबत सूचक विधान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Uday Samant-Ajit Pawar-Vijay Shivtare | अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांचा शिवतारे यांना राग असणे स्वाभावीक आहे. परंतू निवडणुकीला सामोरे जाताना काही बाबी बाजूला ठेवून मित्रपक्ष म्हणून भुमिका बजवायला लागते. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखिल शिवतारे यांच्यासोबत बोलले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशात तिसर्‍यांदा सत्ता आणणे हे एकमेव महायुतीचे उद्दीष्ट असून लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्वच जागांवर विजय मिळविण्यासाठी शिवसेना (Shivsena) पूर्ण ताकदीने उतरली आहे, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले.(Uday Samant-Ajit Pawar-Vijay Shivtare)

शिवसेनेच्या सारसबाग समोरील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशिलकर, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. सामंत यांनी सांगितले, की पुणे लोकसभा मतदार संघातील प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शितवारे यांनी बारामती मतदार संघातून मित्रपक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली. मागील निवडणुकीत विरोधात असताना अजित पवार यांनी जाहीर भाषणांत ‘हा कसा निवडुण येतो, बघतोच’ असा सज्जड दम भरलाच, परंतू शिवतारे यांना पराभूत देखिल केले. हे शब्द जिव्हारी लागल्याने सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य उमेदवारीनंतर शिवतारे यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिल्याने बारामती मतदार संघामध्ये महायुतीमध्ये गोंधळ उडाला आहे.

सामंत म्हणाले, प्रत्येक शिवसैनिक महायुतीच्या ४५ जागा विजयी कशा होतील यादृष्टीने नियोजन करीत आहे.
जागा वाटपाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे शिंदे यांना देण्यात आले आहे.
त्यामुळे त्यांचा शब्द हा आम्ही सर्व शिवसैनिक अंतिम मानणारे आहे.
पुण्यातील चारही लोकसभेच्या जागा या महायुतीला मिळणार आहेत याबाबत शंका नाही.
बारामतीच्या बाबत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिंदे यांची भेट घेतली आहे.
शिवतारे यांचा अपमान झाला किंवा नाही याबाबत भाष्य करणे उचित नाही.अजून निवडणुकीसाठीचा फॉर्म भरण्यासाठी बराच अवधी शिल्लक आहे.त्यामुळे पक्षात काम करताना तडजोडी कराव्या लागतात त्यानुसार शिवतारे योग्य निर्णय घेतली याबाबत शंका नाही. कल्याण डोंबविली लोकसभा मतदारसंघात डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी याबाबतचे पत्र भाजपकडून देण्यात आले आहे. असे पत्र आलेले असले तरी शिंदे हे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊनच निवडणूकीला सामोरे जातील. त्याठिकाणीही भाजपाचे (BJP) कार्यकर्ते हे धनुष्यबाणाला मत देतील असा विश्वास सांमत यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Marged Villages In PMC | महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांना अखेर यूडीसीपीआर नियमावली लागू ! समाविष्ट गावातील रखडलेल्या हजारों बांधकांना होणार फायदा; उद्योजक राहुल तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

Sushilkumar Shinde On PM Narendra Modi | सुशीलकुमार शिंदेंची मोदींवर टीका; पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय शिरलं माहिती नाही…