Pune Bharti Vidyapeeth Police | मोक्काच्या गुन्ह्यात 8 महिने फरार असलेल्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bharti Vidyapeeth Police | मोक्का कारवाई करण्यात आल्यानंतर आठ महिने फरार (Abscond In MCOCA) असलेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई कोंढवा (Kondhwa) येथील तालाब चौकात करण्यात आली आहे. जावेद बद्रेआलम शेख (वय-21 रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, आंबेगाव बु.,), सुरज नंदु बांदल (वय-19 सध्या रा. शनिनगर, आबंगाव बु., पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आयपीसी 307, 385, 324, 452, 143, 144, 147, 149, 323, 504, 506(2) सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, आर्म अॅक्ट, या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भाव करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी मागील आठ महिन्यापासून फरार होते.

आरोपी अस्तीत्व लपवुन वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची ओळख व ठाव ठिकाणा बदलून वास्तव्य करीत होते.
त्यामुळे पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेल्यानंतर आरोपी पळून जात होते.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार चेतन गोरे यांना आरोपींचा चालु मोबाईल नंबर व सोशल मीडियाची माहिती मिळाली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी कोंढवा येथील तालाब चौकात असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपींना तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदीनी वग्याणी यांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहायक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील,
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोडवे, सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता,
पोलीस अंमलदार चेतन गोरे, मंगेश पवार, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, सतिश मोरे, सचिन सरपाले, शैलेश साठे,
निलेश जमदाडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, राहुल तांबे,
विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sinhagad Road News | महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड पोलिसांकडून अटक, 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त

पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून पिस्टलसह अटक

Pune Crime Branch News | घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक; 3 गुन्हे उघडकीस, 5 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Video)