Pune Crime Branch News | पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून पिस्टलसह अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch News | खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप शिक्षा भोगत असलेल्या (Life In Murder Case) व पॅरोल रजेवर (Parole Leave) आल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल (मॅगझीनसह) व तीन काडतुस जप्त करण्यात आले आहेत (pistol seized). कोंढवा येथील खडी मशिन चौकात (khadi machine chowk kondhwa) पिस्टल विक्री करण्यासाठी आला असता पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.29 फेब्रुवारी) करण्यात आली.

प्रदीप उर्फ शप्पु जनार्दन कोकाटे (वय 34रा. वाघमळा, विठ्ठलवाडी, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 कडील अधिकारी व अंमलदार हे वानवडी, कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार, पाहिजे आरोपी चेकिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार खरपुडे यांना माहिती मिळाली की, अहमदनगर विसापूर जेल मधील पॅरोलवर सुटलेला व पॅरोल रजा संपलेली असतांना पुन्हा जेलमध्ये हजर न झालेला आरोपी पिस्टल विक्रीसाठी खडी मशीन चौक, कोंढवा येथे आलेला आहे. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा रचुन ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला 40 हजार 600 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल (मॅगझीनसह) व 3 जिवंत काडतुस मिळून आले. त्याच्या विरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट क 3(25) व महाराष्ट्र पोलीस कयदा 37(1) (3) सह 135 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

आरोपी विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन (kotwali police station), अहमदनगर येथे गु.रजि.नं. 103/2014 आयपीसी
302, 120(ब), 387,507 आर्म ऍक्ट क 3(25) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात विसापूर जिल्हा खुले कारागृह,
अहमदनगर येथे शिक्षा भोगत आहे. दि.01/01/2024 रोजी 30 दिवसाच्या संचित रजेवर कारागृहा बाहेर आला होता व
पुन्हा कारागृहात हजर झालेला नाही. याबाबत विसापूर जिल्हा खुले कारागृह, अहमदनगर यांचेशी संपर्क साधुन कळवले
असल्याचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (PI Ajay Waghmare) यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार
(IPS Pravin Pawar), अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे (ACP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाडवी, पोलीस अंमलदार खरपुडे, रामाणे, लोखंडे, सपकाळ इंगळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sinhagad Road News | महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड पोलिसांकडून अटक, 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त