Pune BJP On Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडला पुण्यात फिरू देणार नाही – धीरज घाटे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune BJP On Jitendra Awhad | ‘संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या विषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सडक्या बुद्धीचे केविलवाणी प्रदर्शन केले आहे. सातत्याने हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्ये करून हिंदूंच्या भवन भडकावून राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला आम्ही पुण्यात फिरू देणार नाही’ असा कडक इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिला. (Pune BJP On Jitendra Awhad)

काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे)चिंतन शिबीर शिर्डी येथे झाले त्यावेळी बोलताना आमदार आव्हाड यांनी ‘श्री राम हे मासांहारी होते’ असे वादग्रस्त वक्तव्य केले त्याचा निषेध आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आंदोलन करून करण्यात आला. (Pune BJP On Jitendra Awhad)

यावेळी बोलताना घाटे पुढे म्हणाले की प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत येत्या २२ जानेवारीला लोकर्पित होत असताना ह्या धर्मांध आमदाराने वक्तव्य करून संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत ह्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात निषेध करत आहे.

या आंदोलनाला घाटे यांच्यासह कॅन्टोमेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक,
कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस, सुशील मेंगडे, सरचिटणीस पुनीत जोशी,
रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राजेंद्र शिळीमकर, राघवेंद्र मानकर, राहुल भंडारे, वर्षा तापकीर, करण मिसाळ,
हर्षदा फरांदे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajanta-Ellora International Film Festival (AIFF) | भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील – जावेद अख्तर

Pune Pimpri Chinchwad Crime News | खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांकडून सोन्याच्या बांगड्या लंपास, पुणे कॅम्प परिसरातील घटना

अश्लील बोलून 14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, दोघांना अटक; मार्केटयार्ड परिसरातील घटना