Pune Pimpri Chinchwad Crime News | खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांकडून सोन्याच्या बांगड्या लंपास, पुणे कॅम्प परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ज्वेलर्सच्या दुकानात (Jeweler Shop) सोन्याच्या बांगड्या खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी हातचलाखीने दोन लाखांच्या दोन सोन्याच्या बांगड्या (Gold Bangles) चोरून नेल्या. हा प्रकार पुणे कॅम्प (Pune Camp) परिसरातील सुभाष ज्वेलर्स या दुकानात सोमवारी (दि.1) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सुभाष जेठालाल ओसवाल Subhash Jethalal Oswal (वय-60 रा. ऑर्चिड बिल्डींग, नानापेठ, पुणे) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) बुधवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन बुरखाधारी महिलांवर आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पुणे कॅम्पमधील सेंटर स्ट्रीट येथे ‘सुभाष ज्वेलर्स’ नावाचे सोन्याचे दुकान आहे.
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काळा बुरखा घातलेल्या दोन महिला दुकानात आल्या.
त्यांनी सोन्याच्या बांगड्या खरेदी करायच्या आहेत असे फिर्यादी यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी त्या दोन महिलांना सोन्याच्या बांगड्याचा ट्रे दाखवला. आरोपी महिलांनी फिर्यादी व कामगारांची दिशाभूल करुन हातचलाखीने ट्रे मधील 1 लाख 90 हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या फसवणूक करुन घेऊन गेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे (PSI Vijay Bansude) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Updates | धोकादायक साधू वासवानी पूल पाडणार, शनिवारपासून वाहतुकीत बदल

Nana Patole-Pune Congress Bhavan | महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ ठरला ! विजयाची खात्री असलेल्या उमेदवारास ‘घरपोच’ उमेदवारी देणार – नाना पटोले

Pune RTO Office News | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रात वातानूकुलीन टॅक्सीच्या भाडे दरात सुधारणा