Pune : बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   बोपदेव घाटात लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर 7 दुचाकीसह इतर असा 10 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ओंकार हिंदूराव शिरतोडे, दीपक बाबा भंडलकर, ॠषीकेश प्रल्हाद बोंडरे (तिघे रा. खुंटे, ता. फलटण, जि. सातारा) अभिजीत उर्फ आबा अंकुश जाधव (रा. चौधरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

गेल्याच आठवड्यात ( दि. 4 एप्रिल) सासवडहून पुण्याकडे येत असताना एका दाम्पत्याला बोपदेव घाटात रात्री अडवले. त्यांना धमकावत किंमती ऐवज व मोबाईल चोरून पसार झाले होते. याप्रकरणी बाळासाहेब भिंताडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान बोपदेव घाटात अनेक घटना घडत असून, वाहन चालकांना लुटले जात आहे. कोंढवा पोलीस तपास काढत होते. यावेळी हे चोरटे फलटण येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या टोळीला पकडले. त्यांच्याकडून 10 गुन्हे उघडकीस आणत पावणे आकरा लाख रुपयांचा ऐवज देखील जप्त केला आहे. या टोळीने कोंढवा, दत्तवाडी, सासवड, बारामती, कराड भागात गुन्हे केल्याची माहिती मिळाली आहे.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेतील निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक निरीक्षक चेतन मोरे, प्रभाकर कापुरे, निलेश वणवे, ज्योतीबा पवार, किशोर वळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.