Pune Chandan Nagar Police | येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chandan Nagar Police | येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerawada Police Station) तडीपार गुन्हेगाराला (Tadipar Criminal In Pune) चंदननगर पोलिसांच्या (Chandan Nagar Police) तपास पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.24) केली. अदिल इफ्तेकार सय्यद (वय-23 रा. संत हॉस्पिटल जवळ, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार विकास कदम व श्रीकांत कोद्रे यांना माहिती मिळाली की, येरवडा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार हा जुना मुंढवा रोड, लाल माती ग्राऊंड वडगाव शेरी येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. आरोपीला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याने कोणतीही परवानगी न घेता शहरात आला होता. त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 विजय मगर (DCP Vijaykumar Magar), सहायक पोलीस आयुक्त,
येरवडा विभाग संजय पाटील (ACP Sanjay Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील (Sr PI Manisha Patil),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड (PI Pandit Rejitwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर
(PSI Tanhaji Shegar), पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोने, महेश नाणेकर, सचिन रणदिवे,
शिवाजी धांडे, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाणे
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक

Sadanand Date | मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIA च्या महासंचालकपदी

Pune Mahavitaran News | सदाशिव पेठेतील खोदाई लेखी परवानगीसह चलन भरूनच: महावितरणकडून स्पष्टीकरण

Pune Chandan Nagar Crime | मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगाराला चंदननगर पोलिसांकडून अटक

Maharashtra Congress On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर काँग्रेस नाराज, ”चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट”