Maharashtra Congress On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर काँग्रेस नाराज, ”चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Congress On Uddhav Thackeray | महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमदेवार तिन्ही पक्षाचे नेते एकत्र पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार होते, मात्र आज अचानक शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) सोशल मीडियावर लोकसभेसाठी आपले १७ उमेदवार जाहीर केले. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही नावे जाहीर केली आहेत. दरम्यान, या पैकी दोन जागांवर मित्रपक्षात चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने नावे जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करताना म्हटले की, मविआच्या जागांच्या संदर्भात बैठक झाली आहे. बैठक अंतिम निर्णय व्हायचा असताना, तसेच मविआची चर्चा संपली नसताना उद्धव ठाकरेंना दोन जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. त्यांनी आघाडीचा धर्म पाळला असता तर आनंद झाला असता.(Maharashtra Congress On Uddhav Thackeray)

वडेट्टीवार पुढे म्हणाले, तीन पक्ष मिळून निर्णय घ्यायचा असतो. चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणे हे आघाडी धर्माला गालबोट आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पुनर्विचार केला पाहिजे. तसे घडले तर खुल्या मनाने निवडणूक पार पाडता आली असती.

वंचितबाबत वडेट्टीवार म्हणाले, प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) पाच जागा देण्याची चर्चा महाविकास आघाडीने केली. एखादी जागा वाढवून देता आली असती. पण प्रकाश आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला तो पथ्यावर पडणारा आहे. एकप्रकारे भाजपाला मदत करणारा तो निर्णय आहे. कारण पुरोगामी मतांचे विभाजन झाले की भाजपाला फायदा होतो.

वडेट्टीवार म्हणाले, आमची प्रकाश आंबेडकरांना विनंती आहे की त्यांनी निर्णय घेतला आहे तो हुकूमशाहीविरोधातल्या
लढ्यात कमकुवत होण्यासाठी घेतला का? त्यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा. आम्ही चर्चेला तयार आहोत.

तर बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवसेनेने जी यादी जाहीर केली त्याबाबत त्यांनी फेरविचार केला पाहिजे.
तसेच प्रकाश आंबेडकरांनीही फेरविचार केला पाहिजे. आघाडी म्हणून पुढे जाणे ही काळाची गरज आहे.
आघाडी धर्म हा प्रत्येकाने पाळला पाहिजे. दुर्दैवाने आमच्या मित्रांनी ती काळजी घेतलेली नाही हे दिसते.
शिवसेनेची यादी जाहीर झाली.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, सांगलीची जागा जाहीर करणे किंवा धारावीतील मतदारसंघ जाहीर
करणे योग्य नाही. कारण आमची अजून चर्चा सुरु आहे. आमची आघाडी आहे. आघाडी धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे.
जे त्यांनी जाहीर केले आहे त्याबाबत त्यांनी फेरविचार केला पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha Election 2024 | शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे ‘नाईलाजास्तव’ लादलेले उमेदवार ! अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागतो हे शरद पवार यांचे नेतृत्व सिद्ध करते – डॉ. अमोल कोल्हे

Shivsena UBT Loksabha Candidates | लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, मावळमधून संजोग वाघेरे, कोण आहेत ‘हे’ 17 उमेदवार?

Sanjay Raut On Mahayuti | महायुतीच्या नेत्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल, गुलाम, मांडलिक, आश्रितांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, वंचितबाबत म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट? धंगेकर-मोहोळ यांच्या समोर वसंत मोरे ठरू शकतात मोठे आव्हान, कारण…

Pune Crime Branch | केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये मोठी कारवाई (Video)