Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी आजपासून

पुणे : Pune Chandani Chowk Bridge Demolition | पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Bengaluru Expressway) चांदणी चौकातील उड्डाणपूल(Chandani Chowk) पाडण्याच्या तयारीला आजपासून (शुक्रवार) सुरूवात करण्यात येणार आहे. या चौकात दररोज कार्यालयीन वेळेत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह विविध कामे हाती घेतली आहेत. याबरोबरच जुना पूल पाडण्याच्या करावयाच्या पूर्वतयारी ला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. (Pune Chandani Chowk Bridge Demolition)

शुक्रवारपासून केवळ पूल पाडण्याबाबतच्या पूर्वतयारीचे काम सुरू होणार आहे. या कामाचा परिणाम या ठिकाणच्या वाहतुकीवर होणार नाही. प्रत्यक्ष पूल पाडण्याची तारीख आधी जाहीर केली जाईल. त्यानुसार पर्यायी मार्गावरून वळविण्यात येईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या खासगी कंपनीला देण्यात आले आहे.
त्यानुसार संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात चांदणी चौकात पुलाची पाहणी केली.
हा पूल स्फोटकांच्या साह्याने पाडता येईल किंवा कसे, याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे.
त्याचा अहवाल प्रशासनाला सादर झाल्यानंतरच पूल पाडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
संबंधित कंपनीचे तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी चांदणी चौकात पुन्हा पाहणी केली. पूल पाडण्याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या असून येत्या दोन दिवसांत ते महामार्ग प्राधिकरणाला संपूर्ण आराखडा सादर करणार आहेत.

Web Title :- Pune Chandani Chowk Bridge Demolition | Preparations for demolition of Chandni Chowk flyover from today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘नवीन अध्यक्ष झाले की बारामतीत येतात कारण..’ अजित पवारांचा ‘दादा स्टाईल’ बावनकुळेंना टोला

Atul Bhatkhalkar | ‘प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट’, भाजप नेत्याची शिवसेनेवर बोचरी टीका

Allu Arjun Net Worth | अबब ! आलिशान बंगला, लग्झरी गाड्या, महिन्याला ‘इतके’ कोटी कमावतो ’पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन