Pune Chandani Chowk | चांदणी चौकातील कामाला प्रशासनाकडून गती, सेवारस्त्यासाठी 5 मिळकतींचे भूसंपादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chandani Chowk | पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (Pune-Bangalore National Highway 4) वर चांदणी चौक (Pune Chandani Chowk)  येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर (Traffic Jam) उपाययोजनांतर्गत सेवारस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गतीने कार्यवाही करत मुळशी तालुक्यातील बावधन येथील 5 मिळकतींच्या भूसंपादनाचे (Land Acquisition) निवाडे जाहीर केले असून सोमवारी या जमिनींचा ताबा घेण्यात येणार आहे.

चांदणी चौकातील (Pune Chandani Chowk) वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे गतीने कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी भूमी संपादन (समन्वय) प्रवीण साळुंखे (Pravin Salunkhe) आणि विशेष भूमी संपादन अधिकारी द. दा. काळे यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करीत 20 दिवसांच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नुकतीच चांदणी चौक परिसराला भेट देऊन  वाहतूक कोंडी
सोडविण्यासाठी गतीने उपाययोजनांचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक (Union Road Transport) व महामार्ग मंत्री नितीन गडकरी
(Highways Minister Nitin Gadkari) यांनी 2 सप्टेंबर रोजी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन या चौकात
उभारण्यात येणाऱ्या बहुमजली उड्डाणपूल प्रकल्पासाठी (Flyover Project) तसेच लगतच्या सेवा रस्त्यासाठी
(Service Road) आवश्यक उर्वरित जमिनीचे भूसंपादन त्वरित करण्याचे निर्देश दिले होते.
त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उर्वरित भूसंपादनाची कार्यवाही एक महिन्याच्या आत करण्याची ग्वाही दिली होती. या भूसंपादनामुळे चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पाला गती येणार आहे.

चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या लगत पुणे महानगर पालिकेच्या (Pune Municipal Corporation) विकास योजना आराखड्यात मंजूर सेवा रस्त्याचे रुंदीकरणासाठी 5 मिळकतींचे भूसंपादन वाटाघाटीने करण्यासाठी पुणे मनपा प्रयत्नशील होती.
तथापि, यामध्ये काही न्यायालयीन प्रकरणे झाल्यामुळे सदर भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करून देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार मार्च 2022 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी प्राथमिक अधिसूचना काढल्या.
त्यानुसार शुक्रवारी 16 सप्टेंबर रोजी बावधन येथील एकूण 3 हजार 215 चौ. मी. क्षेत्रफळाच्या 5 मिळकतींचे निवाडे (अवॉर्ड) जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये तातडीने 11 कोटी 42 लाख रुपये मोबदला देण्यात येणार आहे.
या मिळकती सोमवारी (दि. 19) ताब्यात घेण्यात येऊन महानगरपालिकेकडे व त्वरित महापालिकेकडून भारतीय
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे National Highways Authority of India (एनएचएआय-NHAI) हस्तांतरित करण्यात येतील.

या प्रकल्पासाठी डिसेंबर 2020 मध्ये 48 मिळकतींच्या भूसंपादनाचा अंतिम निवडा जाहीर करण्यात आला होता.
त्यानुसार जानेवारी 2021 मध्ये 6 हे. 50 आर जमिनीचा ताबा घेऊन पुणे मनपाकडे व त्यानंतर एनएचएआय कडे हस्तांतरित करण्यात आली होती.
त्यानंतर 5 मिळकतींचे भूमीसंपादन पूर्ण होत असल्याने आता चांदणी चौकातील प्रकल्पासाठीची भूसंपादनाची
कोणतीही कार्यवाही शिल्लक नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

Web Title :- Pune Chandani Chowk | Land acquisition of 5 acres for service road in Chandani Chowk