Pune : ट्रेड फंड कंपनीकडून 7 कोटी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 7.5 लाख रुपयांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ट्रेड फंड कंपनीकडून 7 कोटी मिळवून देण्याचे आमिष दाखवून साडे सात लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हा सर्व प्रकार 13 ते 18 मे या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी 47 वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोनकरून मी ट्रेड फंडमध्ये बिझनेस करत आहे. ट्रेड बिझिनेसद्वारे तुम्हाला बँकेतून 7 कोटी रुपये हे कंपनीच्या खात्यावर मिळवून देण्याचे तसंच त्याद्वारे कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना डीडी पास करण्यास व इतर काम करण्यासाठी फिर्यादी पैसे लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर प्रथम अडीच लाख रुपये घेतले. त्यानंतर 5 लाख रुपये घेतले. तरीही त्यांना पैसे मिळाले नाही. पैसे मिळत नसून, दिलेले पैसेही परत देत नसल्यानी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.