Pune Cheating Fraud Case | पुणे : शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला 10.50 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment in Share Market) केल्यास कमी कालावधी जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची दहा लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत लोहगाव (Lohegaon) परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन चार जणांवर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या फेसबुक अकाउंटवर आरोपींकडून मेसेज आला होता. विराम बजाज असे नाव असलेल्या सायबर गुन्हेगाराने (Cyber Criminals) फिर्यादी यांना शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवले. गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात नफा मिळेल असे सांगितले. तसेच मार्केटमध्ये आयपीओ येणार असल्याचे सांगून एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.(Pune Cheating Fraud Case)

त्यानंतर आरोपींनी शेअर मार्केटमध्ये झालेला नफा मिळवण्यासठी ट्रक्सची रक्कम ट्रान्स्फर करावी लागेल असे सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर 10 लाख 47 हजार 700 जमा केले.
मात्र, त्यानंतर फिर्यादी यांना कोणताही नफा अथवा घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सर्जेराव कुंभार (PI Sarjerao Kumbhar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Chandrakant Pulkundwar | पुणे विभागीय लोकशाही दिन संपन्न ! गावातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे निर्देश