Pune Cheating Fraud Case | पुणे : बनावट कागदपत्रे देऊन बँकेची 18 लाखांची फसवणूक

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | ऑटोमोबाईल्सच्या नावाने बनावट कागदपत्रे (Fake Documents) बनवून पुण्यातील बँकेला 18 लाखांचा गंडा घातला. हा प्रकार विद्या सहकारी बँकेच्या (Vidya Sahakari Bank) वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk) येथील सिंहगड रोड शाखेत 14 मे 2021 ते 29 मार्च 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दिपाली बाळकृष्ण आठल्ये (वय-47 रा. धायरी फाटा, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन चैतन्य श्रीकांत नाईक Chaitanya Srikant Naik (रा. तुकाई नगर, वडगाव बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 417, 419, 420, 465, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Cheating Fraud Case)

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या विद्या सहकारी बँकेच्या सिंहगड रोड शाखेत जिप कंपास गाडी खरेदी करण्यासाठी स्काय मोटो अॅटोमोबाईल्स नावाने खोटे कोटेशन तयार करुन बँकेत जमा केले. त्या आधारे बँकेकडून 18 लाख 40 हजार रुपये कर्जाची मागणी केली. त्यानुसार बँकेने 18 लाख रुपये कर्ज मंजुर केले.

आरोपीने आयसीआयसीआय बँकेच्या कल्याणी नगर शाखेत बनावट खाते उघडून त्यामध्ये मंजुर झालेल्या कर्जाची रक्कम जमा केली.
त्यानंतर बँकेला स्काय मोटो ऑटोमोबाईल नावाने खोटी पोचपावती दिली.
आरोपीने करारपत्रानुसार गाडी खरेदी केली नाही.
तसेच चैतन्य याने पुणे आरटीओकडे रजिस्टर नसलेली जीप कंपास गाडी दाखवून बँकेची फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालसुरे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pandav Nagar Crime | जुन्या वादातून मित्रावर कोयत्याने वार, पांडवनगर परिसरातील घटना