Pune City Police | शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदाराना आज पदोन्नती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस Pune City Police दलातील 575 पोलीस अंमलदाराना आज पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता Commissioner of Police Amitabh Gupta यांच्या सुचनेनुसार एक समिती नेमण्यात आली होती. त्यात पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार Police Constable दर्जाचे पोलीस अंमलदार यांच्या पदोन्नतीबाबत कार्यवाही सुरू होती.
अप्पर आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे,
सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र चव्हाण आणि प्रशासकीय अधिकारी शशिकला भालचीम यांचा
या समितीत समावेश होता. या समितीने कार्यवाही करून आज 575 पोलिसांना पदोन्नतीची दिली आहे.

Pune Crime News | पुण्यातील बुधवार पेठेत महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ

यात 200 पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस फौजदार या पदावर,
249 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर तर 126 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
यापूर्वी याच वर्षे फेब्रुवारी एप्रिल मध्ये शहर पोलीस दलातील 172 आमलदारांना पदोन्नती देण्यात आली होती.
कोविड 19 मुळे ही पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती.
पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्त, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि इतर अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Titel : Pune City Police 575 police officers in the city police force promoted today

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमच्याकडे असेल 2 रुपयांची ही खास नोट तर घरबसल्या बनू शकता लाखोपती, जाणून घ्या करन्सी नोटांची वैशिष्ट्य

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना