Pune Congress Protest Against Kirit Somaiya | पुणे शहर काँग्रेसने दाखविले किरीट सोमय्या यांना काळे झेंडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Congress Protest Against Kirit Somaiya | भाजपा नेते किरीट सोमय्या आज पर्वती भागातील लक्ष्मीनगर येथील भाजप कार्यकर्त्याच्या घरी छप्पन भोग जेवायला येत असल्याचे कळाल्यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arv inde Shinde) यांच्या नेतृत्वाखाली पर्वती ब्लॉक काँग्रेसच्या वतीने गजानन महाराज मठ चौक येथे किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ घोषणा देवून काळे झेंडे दाखवून महिला कार्यकर्त्यांनी गाडीवर बांगड्या फेकल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या गाडींवर काळे झेंडे फेकले. (Pune Congress Protest Against Kirit Somaiya)

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भाजपाचे बेशरम नेते लज्जास्पद कृत्य करून त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर टाकतात आणि सरकार त्यांना सिक्युरिटी देते. त्यांना खरेतर ट्रिपल एक्स सिक्युरिटी दिली तरी काँग्रेसचे त्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहिल. घृणास्पद कृत्य करून निर्लज्जपणे जेवणावळी झोडायला पुण्यात आले. त्यांना ज्या ज्या ठिकाणी विरोध दर्शविता येईल त्या त्या ठिकाणी आक्रमकपणे विरोध दर्शविला जाईल.’’ (Pune Congress Protest Against Kirit Somaiya) यावेळी त्यांच्या गाडीवर काळे झेंडे फेकणाऱ्या काँग्रेसच्या सद्दाम शेख, स्वप्निल नाईक, अक्षय माने, अक्षय सागर या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, रफिक शेख, सुजित यादव, द. स. पोळेकर,
संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, शिवा भोकरे, प्रकाश आरणे, ताई कसबे, मनिषा गायकवाड, ज्योती आरवेन, जया गांगुर्डे,
गोरख मरळ, सुजित लाजुरकर, आशितोष शिंदे, मुन्ना खंडेलवाल, छाया जाधव, सुंदरा ओव्हाळ, उषा राजगुरू,
सोनिया ओव्हाळ, पपिता सोनावणे, कविता गायकवाड, मनिषा ओव्हाळ, कर्वेताई, शब्बिर शेख, मनिषा शिंदे, छाया साळुंखे,
अपर्णा तावरे, मनिषा शिंदे आदी सहभागी झाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aakash BYJU’S | आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा; इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार

Dengue Cases on the Rise in Pune: Health Authorities on High Alert