Pune Congress Protest Against Smriti Irani | पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने केंद्रीय महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या बेताल वक्तव्यावर जाहीर निषेध आंदोलन

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress Protest Against Smriti Irani | केंद्रिय मंत्री स्मृती इराणी या पवित्र लोकसभेला सुद्धा आपले कला श्रेत्र समजुन आपला अभिनय सादर करत दोन महिन्यांपासुन जळत असलेल्या मनिपुर मध्ये घडलेल्या दुर्देव्यी घटनेबद्दल भ्र शब्द न काढता इतर गोष्टींमध्ये विषयांतर करत देशातील जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करित आहेत. (Pune Congress Protest Against Smriti Irani)

जनता अश्या या भुलथापांना बळी न पडता मनिपुर दुर्घटनेतील आमच्या भगिनींना न्याय मिळवुन देण्यासाठी व एक स्त्री असुन सुद्धा नेहमीच स्त्री विरोधात कारवाई करणार्‍या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचा व केंद्र सरकारचा निषेध पुजा मनिष आनंद यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे. गुडलक चूक, कलाकार कट्टा इथे हे निषेध आंदोलन आज दिनांक २८/०७/२३ रोजी सकाळी ११:०० वा पार पडले. (Pune Congress Protest Against Smriti Irani)

ADV

कलाकारांचा आम्ही नेहमी आदर करतो. संविधानिक पदावर असणाऱ्या मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध बोलणं अपेक्षित होत. परंतु सवयीप्रमाणे नौटंकी करून दिशाभूल केली. यामुळे समस्त महिलांमधे नाराजी आहे. तसेच, पंतप्रधान मोदी हे क्राईम मिनिस्टर आहेत. भाजपा भगाव, संविधान बचावचा नारा देत आपले मत मोहन दादा जोशी यांनी व्यक्त केले.

ज्या देशाचा स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाने महिला एकत्र येवून लढल्या. आज त्याच भारतात भाजपाचे नेते, पदाधिकारी महिलांवर अत्याचार करतं आहेत. या संवेदनशील विषयावर पंतप्रधान बघ्याची भूमिका घेत आहे.

इराणी या मनुस्मृती इराणी आहेत. महिला विरोधी धरण त्या राबवत आहेत. महिला बालविकास मंत्री म्हणून त्यांना
त्याचे कर्तव्य आठवतं नाही. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार हा राजकीय मुद्दा म्हणून इराणी या कडे पहातात.
महिलांच्या सन्मानाखातर समस्त काँग्रेस पक्ष हा लढा देत आहे. मणिपूर मधील महिलांवर झालेला अत्याचार,
हिंसा व बळी हे आरएसएस प्रणित भाजपाच्या भ्रष्ट व हिंसक कृतीला काँग्रेस प्रेम व शांती प्रस्थापित करून उत्तरं देईल.
संविधान हटवून मनुस्मृती लागू करण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडू. असे मत प्राची दुधाने यांनी व्यक्त केले.
राजश्री अडसूळ यांनी प्रास्ताविक केले तर प्रियांका रणपिसे यांनी आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी (Congress Mohan Joshi), प्राची दुधाने
(उपाध्यक्ष पुणे शहर महिला काँ.), स्वाती शिंदे (सरचिटणीस महा. महिला काँ.), प्रियांका रणपिसे (एस.सि. उपाध्यक्ष प्रदेश),
अश्विनी गवारे, रेश्मा शिलेगावकर, राजश्री अडसूळ, प्रियांका मंदाळे, अंजली सोलापूर, ज्योती चंदेवळ, ज्योती परदेशी,
पपिता सोनावणे, शिवानी माने, मंदाकिनी नलावडे, मनीषा करपे, सुरेखा मारणे, पौर्णिमा भगत, सारिका मुंडावरे, मान्यवर,
पदाधिकारी व कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट, अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण