Maharashtra Political News | रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट, अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Karjat Jamkhed MLA Rohit Pawar) यांनी आज अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांची भेट घेतली. विधीमंडळातील अजित पवार यांच्या दालनात जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मतदारसंघातील वेगवेगळ्या मुद्द्यांसदर्भात ही भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी भेटीनंतर दिली. (Maharashtra Political News)

एमआयडीसीच्या मुद्यावर रोहित पवार जोरदार टीका केली होती. याबाबत त्यांनी एक दिवसाचं आंदोलन देखील केलं होतं. कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नसल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या संदर्भात बैठक लावण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कदाचित प्राथमिक भेट ही उपमुख्यमंत्र्यांसोबत असावी असं म्हटलं जात आहे. (Maharashtra Political News)

अजित पवार यांच्या भेटीनंतर रोहित पवार म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी (Competitive Exam) एक हजार रुपये घेतले जातात, याबाबत उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली.
राजस्थान आणि मध्य प्रदेशात सहाशे रुपये भरले की कितीही वेळा परीक्षा देता येते.
अशाच पद्धतीने आपल्याकडे राबवावी, यासाठी दादांशी चर्चा केली.
MPSC साठी पाठपुरावा घेतला, लक्ष घालण्याची विनंती केली.
पिक विमा (Crop Insurance) भरताना इंटरनेट डाऊन असल्याने अनेकांना विमा भरता आला नाही, त्यात मुदत वाढवण्याची मागणी केली. या सरकारमध्ये एकमेव अजित दादा असे आहेत, जे काम मार्गी लावू शकतात. आम्ही एकत्र जेवण केलं. राजकीय भतभेद आहेत…पण, कौटुंबिक संबंधात ते येऊ नयेत, याची आम्ही काळजी घेतो. या भेटीत आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन : वाघोलीत वाईन शॉपवर रात्री 11.30 वाजता ‘राडा’; तरुणाच्या डोक्यात घातली बियरची बाटली