Pune News : गेल्या 24 तासात पुण्यात ‘कोरोना’चे 192 नवे पॉझिटिव्ह, 5 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात रविवारी (दि.31) 192 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 238 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 115 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 201 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 764 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 944 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 85 हजार 922 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 79 हजार 214 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 78 हजार 888 रुग्णांपैकी 3 लाख 64 हजार 743 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 5 हजार 184 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 961 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.27 टक्के आहे.