Pune Corporation Elections | पतित पावन संघटनेचा ‘भाजप’ला धक्का ! पुणे महापालिका निवडणुक लढविण्याची घोषणा; जाणून घ्या भूमिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  | हिंदुत्वाच्या मुद्दयावर पाठींबा दिलेला पक्ष पुण्यात केवळ व्यावसायीक हितसंबध जपण्यात मश्गुल आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी (Pune Corporation Elections) नसून फक्त ‘ठेकेदारांचे’ प्रतिनिधी आहेत, असा थेट आरोप करत भाजपची मित्र संघटना पतित पावन संघटनेने (patit pawan sanghatana)बंडाचे हत्यार उपसले आहे. आगामी पुणे महापालिका (Pune Corporation Elections) निवडणुकीसह संघटनेची ज्या स्थानीक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविण्याची आज घोषणा केली.

पतित पावन संघटनेचे राजाभाउ पाटील (Rajabhau Patil), शिवाजीराव चव्हाण (Shivajirao Chavan), श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार, स्वप्निल नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुण्याचा विकास थंडावला आहे.
ज्या पक्षाला हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्दयावर पाठींबा दिला होता त्या पक्षाच्या शहर पातळीवरील नेत्यांना हिंदुत्वाशी काही देणे घेणे नाही.
केवळ व्यावसायिक हितसंबध जपण्यासाठी ‘ठेकेदारांचे’ प्रतिनिधीत्व करत आहेत.

अन्याय, अत्याचाराविरूद्ध लढणारी ही पतित पावन संघटनेची ओळख आहे. परंतू यापुढील काळात राजकारणाच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे लोकसेवेत कार्य करण्याकरीता संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच पुणे महापालिका व ज्या ठिकाणी संघटनेची ताकद आहे अशा स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार आहे.
संघटनेची पुढील दिशा विस्तृतपणे लवकरच पुणेकरांसमोर मांडण्यात येणार असल्याचेही या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

Web Title : Pune Corporation Elections | patit pawan sanghatana on BJP! Announcement to contest Pune Municipal Corporation elections; Learn the role

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IPS Transfer Maharashtra | हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त ! पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांची नियुक्ती

Pune News | ‘जेनेसीस इंडिया’च्या पदाधिकारी प्रोमोही शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

Indapur News | इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक सुहास शेळकेंवर निलंबनाची कारवाई करावी – भाजप