Pune Corporation | पेट्रोल, डिझेल दरवाढीची झळ महापालिकेलाही; टाटा निक्सॉन कंपनीच्या पर्यावरणपूरक 38 ई मोटारी भाडेतत्वावर घेणार

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पेट्रोल, डिझेल दरवाढीची (petrol diesel price increase) झळ आता महापालिकेलाही (Pune Corporation) बसली आहे. यामुळे वर्षानुवर्षे महागड्या गाड्यांमध्ये फिरणारे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांसाठी टाटा निक्सॉन (tata nexon) कंपनीच्या ३८ ई मोटारी (e-motor) भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. या मोटारींमुळे महापालिकेला (Pune Corporation) आठ वर्षासाठी २३ कोटी २८ लाख रुपये खर्च येणार असून दरवर्षी टप्प्याटप्प्याने हे पैसे द्यायचे आहेत. यामुळे महापालिकेची दरमहा १ लाख ७७ हजार रुपयांची बचत होणार आहे.

महापालिकेकडे अधिकारी आणि पदाधिकार्‍यांसाठी ऍम्बेसिडर, इंडिका, इंडिगो, मांझा, टोयाटो अल्टीस, सियाझ, टाटा टियागो, कोरोला, ईटीओस आणि स्विफ्ट डिझायर या पेट्रोल व डिझेलवर धावणार्‍या १०७ मोटारी आहेत.
तर भाडेतत्वावरील जीप, इको व्हॅन आणि इंडिका या कंपनीच्या ८० मोटारी आहेत. महापालिकेच्या मालकिच्या मोटारींना दरमहा सरासरी १७५ लिटर डिझेल अथवा पेट्रोल लागते.
तर ऍम्बेसिडर वाहनांना सरासरी २०० लि. पेट्रोल लागते. ताफ्यामध्ये पेट्रोलवर धावणार्‍या ऍम्बेसिडर गाड्यांची संख्या सर्वाधिक अर्थात ३९ इतकी आहे.
यापैकी १६ ऍम्बेसिडरचे आयुष्यमान १० ते १५ वर्षे असून २३ ऍम्बेसिडरचे आयुष्यमान आणखी ५ ते १० वर्षे आहे.
तर अलिकडेच ७ इंडिका मोटारींचीही खरेदी केली असून त्यांचे आयुर्मान १५ वर्षांपेक्षा अधिक आहे.
तर ३३ सियाझ, टियागो आणि स्विफ्ट डिझायर गाड्यांचे आयुर्मान ५ वर्षांपेक्षा कमी राहीले आहे.
त्यामुळे येत्या पाच वर्षांच्या आतमध्ये या मोटारी मोडीत काढाव्या लागणार आहेत.

इलेक्ट्रीक मोटारींमुळे पांरपारिक इंधन खर्चात बचत आणि पर्यावरणाची हानी कमी होण्यासही मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. कडे महापालिकेने ई मोटारी भाडेतत्वावर पुरविण्यासाठी विचारणा केली होती.
त्यानुसार मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. ने महापालिकेला टाटा नेक्सॉन कंपनीच्या ई मोटारी चालकासह ८ वर्षे भाडेतत्वावर देण्याचे दरपत्रक दिले.
८ वर्षांनंतर करार संपल्यानंतर मोटारीच्या एमआरपीच्या ५ टक्के रक्कम भरल्यास त्या मोटारी महापालिकेलाच मालकीहक्काने देण्याचेही कंपनीच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
३८ वाहनांसाठी चालकासह २३ कोटी २८ लाख ८८ हजार रुपये खर्च येणार असून तो ८ वर्षे टप्प्याटप्प्याने द्यायचा आहे.

पेट्रोल व डिझेलवरील वाहनासाठी प्रत्येक महिन्याला ६३ हजार रुपये खर्च येत असून टाटा नेक्सॉन ई मोटारीसाठी ५८ हजार ३५० रुपये खर्च होणार आहे. प्रत्येक मोटारीमागे सरासरी ४ हजार ६५५ रुपये बचत होणार असून ३८ वाहनांसाठी दरमहा १ लाख ७७ हजार रुपये बचत होणार आहे. पुढील आठ वर्षांचे दायित्व तसेच कंपनीसोबत करार करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

५ वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या मोटारींना सीएनजी कीट बसविणार?

पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने तसेच पर्यावरणपूरक वाहन म्हणून पीएमपीएमएलने (PMPML) काही वर्षांपुर्वी सीएनजी बसेसचा तसेच ई बसेसचा ताफ्यामध्ये समावेश केला आहे. परंतू यानंतरही पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या मागणीनुसार गेल्या काही वर्षामध्ये अधुनिक महागड्या वाहनांची महापालिकेने खरेदी केली आहे. विशेष असे की या कालावधीत माफक दर असलेली आणि पर्यावरण पूरक सीएनजी वाहनेही बाजारामध्ये उपलब्ध झालेली होती. परंतू एकेकाळचे प्रतिष्ठीत वाहन म्हणून अनेकांची पसंती इंधन आणि मेन्टेनन्सच्या दृष्टीने पांढरा हत्ती ठरणार्‍या ऍम्बेसिडर व अधुनिक वाहनांनाच राहीली आहे. अशा परिस्थितीत नव्याने घेण्यात येणार्‍या ई मोटारी मासिक सर्वाधीक वाहन वापर करणारे पदाधिकारी आणि अधिकारी वापरणार? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
तसेच ज्या पेट्रोल व डिझेल वाहनांचे आयुर्मान ५ वर्षांच्यापुढे आहे, त्यांना सीएनजी कीट बसवून त्याचा वापर केला जाणार? असेही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

Web Title : Pune Corporation | Petrol, diesel price hike to the Municipal Corporation; Tata will lease Nixon’s eco-friendly 38 E-car

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SBI Salary Account | SBI च्या ‘या’ खात्यावर तुम्हाला मिळतील 30 लाखापर्यंतच्या ‘या’ सुविधा अन् 5 मोठे फायदे, जाणून घ्या

Solapur News | जेऊरच्या रवीकिरणची नेदरलँडला निवड; आर्थिक मदतीसाठी केलं ‘हे’ आवाहन