Pune Court News | वाघोली येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायलयाकडून जामीन मंजुर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Court News | तरुणीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले (Physical Relationship) . याप्रकरणी गौरव पांडूरंग बोराटे (वय-27 रा. बोराटे वस्ती, खराडी, पुणे) याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) आयपीसी 376/2/एन,506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. जून 2021 ते सप्टेंबर 2023 दरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील आरोपी गौरव बोराटे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. राठोड यांनी जामीन मंजुर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील सिद्धांत मालेगावकर (Adv Siddhant Malegaonkar) यांनी दिली. (Pune Crime News)

गुन्ह्यातील आरोपी गौरव बोराटे याच्यातर्फे ॲड. सिद्धांत मालेगावकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, वस्तुस्थिती अशी की, जून 2021 मध्ये फिर्यादीने बलात्काराची पहिला घटना घडली तेव्हा फिर्यादीचे वय 23 वर्षे होते. त्यावेळी देखील तिला आरोपी विवाहित असल्याची माहिती होती. या प्रकरणात लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा फायदा उचलण्याचे नसून, प्रथमदर्शनी हे स्पष्ट आहे की, तक्रारदाराने पहिल्या घटनेच्या सुमारे तीन वर्षांनी तक्रार दाखल केली होती. सुमारे तीन ते चार वर्षे फिर्यादीने आरोपींचे कथित कृत्य कोणत्या कारणासाठी सहन केले हा प्रश्न आहे? या वस्तुस्थितीमुळेच प्रथमदर्शनी फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील संबंध हे सहमतीने असल्याचे स्पष्ट होते. (Pune Rape Case)

आरोपीला या गुन्ह्यामध्ये खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. त्याच्यावर लावलेले सर्व आरोप हे खोटे असून त्यांनी अशा प्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नाही. या प्रकरणात आरोपीला 10 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून कोणत्याही प्रकारची जप्ती नाही, तसेच पुढील तपास पूर्ण करण्यासाठी आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करण्यात काहीच हरकत नाही. आरोपी न्यायालयाच्या सर्व आदेशांचे पालन करेल, असा युक्तीवाद अॅड. मालेगावकर यांनी केला.(Pune Court News)

न्यायालयासमोर ठेवण्यात आलेल्या पुराव्याचा विचार करता न्यायालयाने असे निष्कर्ष नोंदवले की, या गुन्ह्यातील
तपासाची कागदपत्रे उघड करत आहेत की, ठोस तपास संपला असून तपास पूर्ण करण्यासाठी आरोपीच्या पुढील
कोठडीची आवश्यकता नाही. आरोपीची गुन्ह्याची जबाबदारी पुढील खटल्या दरम्यान निश्चित केली जाऊ शकते व
गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेता, अर्जदार जामिनासाठी पात्र आहे व आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद मान्य करुन
आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला.

आरोपी गौरव बोराटे याच्या वतीने मालेगावकर अँड असोसिएटस् तर्फे ॲड. सिद्धांत मालेगावकर यांनी कामकाज पाहिले.
त्यांचा युक्तिवाद महत्वाचा ठरला आहे. तसेच ॲड. प्रमोद धुळे, अ‍ॅड. वैष्णवी पवार, अ‍ॅड. कुणाल पगार, अ‍ॅड. प्रेरणा बावीस्कर,
अ‍ॅड. श्रद्धा जाधव, अ‍ॅड. शुभंकर मालेगावकर, अ‍ॅड. कुणाल सोनवणी, अ‍ॅड. आकाश मायने, अमोल घावटे व हैदर तापिया,
रोहित चिटीकेन यांनी कामकाज पाहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu | ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त, पंतप्रधान समितीकडून निवड