Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu | ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त, पंतप्रधान समितीकडून निवड

नवी दिल्ली : Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu | माजी सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही नेमणूक केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे एकमेव विरोधी पक्षाचे सदस्य आहेत. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार अधीर रंजन चौधरी यांनी समितीच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे.

अत्यंत शिस्तबद्ध अधिकारी अशी ख्याती असलेले आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयुक्तपद रिकामे होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोयल यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. गोयल यांचे राजीव कुमार यांच्याशी पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यावरून तीव्र मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.(Gyanesh Kumar- IAS Sukhbir Singh Sandhu)

पंतप्रधानांच्या समितीमधील सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी माध्यमांना सांगितले की, समितीसमोर उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, इंदभर पांडे, सुखबीर संधू, सुधीर कुमार आणि गंगाधर रहाटे यांची नावे होती. त्यातून आम्ही ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवड केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Muralidhar Mohol – MLA Ravindra Dhangekar | पुण्यात मोहोळ विरूद्ध धंगेकर सामना रंगणार?, काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष

Mahavikas Aghadi-Lok Sabha Election 2024 | ”महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण, ४८ लोकसभा मतदारसंघांची…”, संजय राऊत यांची महत्वाची माहिती

NCP Sharad Pawar On Modi Govt | ”भाजपाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट”, शरद पवार यांचा मोदी सरकारवर आरोप

Pune Sinhagad Road Crime | धक्का लागल्याच्या कारणावरुन कारची तोडफोड, सिंहगड रोड परिसरातील प्रकार

Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती स्थिर, उद्या घरी सोडणार

पुणे : पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण, सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक