Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

आजपासून कलम १४४ अंतर्गत मार्गदर्शक सूचना लागू; नियमभंग केल्यास कडक कारवाईचा पोलीस आयुक्तांचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune CP Amitesh Kumar | शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहित पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि.19) पत्रकार परिषदेत दिली. तसेच नियमांचे उल्लंघन करुन पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय बिअर बार, परमिट रुम, रेस्टॉरंट यांच्यासाठी कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. (Pune Police News)

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 144 सीआरपीसी ची ऑर्डर काढण्यात येणार आहे. यामध्ये बार, परमिट रुम, रेस्टोरंट, पब, रुफटफ रेस्टॉरंट यांना नोटीस दिली जाणार आहे. तसेच मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल सुरु राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर संबंधित हॉटेलवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.(Pune CP Amitesh Kumar)

रात्री 10 पर्य़ंत म्युजिक सुरु ठेवता येणार

रुफटफ व टेरेस हॉटेल यांना दारु विक्रीची परवानगी नसेल तर त्यांना त्याची विक्री करता येणार नाही. जर विनापरवाना दारुची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल असेही आयुक्तांनी सांगितले. तसचे रुपटफ व टेरेस हॉटेलला परवानगी असली तरी रात्री दहा पर्यंतच म्युजिक व डिजे लावता येईल. जे डिजे कलाकार बाहेरुन येऊन सादरीकरण करणार आहेत, त्यांनी पंधरा दिवस आधी पोलीस आयुक्तालयातून परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

हॉटेल चालकांना सीसीटीव्ही बंधनकारक

शहरातील हॉटेल चालकांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. तसेच ज्या ठिकाणी नागरिकांची ये-जा असते त्या ठिकाणी देखील (वॉशरुम सोडून) सीसीटीव्ही लावले पाहिजेत. याशिवाय हॉटेल चालकांनी दोन डिव्हीआर ठेवावेत. जेणेकरुन एक डिव्हीआर पोलिसांनी तपासणीसाठी नेला तर दुसऱ्या डीव्हीआर मध्ये चित्रीकरण सुरु राहील.

बाऊन्सरचे पोलीस व्हेरिफिकेशन करावे

काही हॉटेलमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बाउन्सर ठेवले जातात. मात्र, त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे.
त्यांचे मागील दहा विर्षात कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड नसेल अशांची नियुक्ती केली पाहिजे.
तसेच बाऊन्स यांचे क्रिमिनल रेकॉर्ड असेल आणि त्यांना कामावर ठेवायचे असेल तर संबंधित झोनच्या पोलीस
उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये सिगारेट ओढण्यासाठी स्मोकिंग झोन असणे आवश्यक आहे.
इतर ठिकाणी सिगारेट ओढता येणार नाही, असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

अवैधरित्या हुक्काबार चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

15 दिवसांसाठी आदेश लागू

144 चे आदेश हे पुढील पंधरा दिवसांसाठी असणार आहेत.
लोकांकडून हरकती व सूचना आल्यानंतर त्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती ईमेल किंवा पोलीस आयुक्तालयात द्यावेत असे आयुक्तांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका