Pune Crime | चित्रपट निर्मितीसाठी पुण्यात सुरु केली वित्तिय संस्था, कर्ज मंजुरीच्या आमिषाने 100 ते 150 जणांना फसवणारी बंटी-बबलीची जोडी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चित्रपट निर्मितीसाठी पैसे नसल्याने पुण्यात बनावट वित्तीय संस्था (Financial Institutions) सुरु करुन तात्काळ कर्ज (Instant Loan) उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून 100 ते 150 जणांना गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीच्या (Bunty-Bubbly) जोडीला पुणे पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या (Pune Crime) आहेत. या जोडप्याला स्वारगेट पोलिसांनी गुजरात मधील सूरत (Surat) येथून अटक (Arrest) केली आहे. आरोपींनी कर्ज मंजुरीच्या आमिषाने 12 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे.

दिपाली जितेंद्र पौनिकर Dipali Jitendra Paunikar(वय 32), हेमराज जीवनलाल भावसार Hemraj Jeevanlal Bhavsar (वय 28 दोघे रा. सार्थक सोसायटी, सिंगनपूर, सूरत, गुजरात-Gujarat) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

दिपाली आणि हेमराज हे दोघे एकत्र राहत असून त्यांना नृत्याची आवड आहे. त्यांनी त्यांच्या नृत्याची क्लिप समाजमाध्यमावर प्रसारित करुन लोकप्रियता मिळवली होती. दोघांना चित्रपटात काम करायचे होते. मात्र पैसे नसल्याने ते पुण्यात आले. पुण्यातील स्वारगेट भागातील मुकुंदनगर भागातील एका इमारतीत त्यांनी मानधन मायक्रो फायनान्स (Mandhan Micro Finance) नावाची वित्तीय संस्था सुरु केली. गुलटेकडी परिसरातील कामगार लोकांना त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले. पैसे घेऊन कर्ज न देता या दोघांनी ऑफिस बंद करुन पळून गेले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station)
दोघांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करुन
पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक आयुक्त सुषमा चव्हाण
(ACP Sushma Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior Police Inspector Ashok Indalkar),
गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव (Crime Branch Inspector Somnath),
उपनिरीक्षक अशोक येवले (Ashok Yewle), फिरोज शेख (PSI Feroze Sheikh), शिवदत्त गायकवाड
(PSI Shivdutt Gaikwad), घुले, गोंडसे, होळकर यांनी तपास सुरू केला.
दिपाली आणि हेमराज सूरतमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोघांना सूरतमधून अटक केली.

Web Title :-  Pune Crime | 12 lakh looted from 150 people through bunty babli organization hero heroine of gujarat arrested by pune police crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Crime | अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा ! झोपच्या गोळ्या, दोरी आणि चाकूचा वापर करून प्रियकराच्या मदतीने केला खून

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! तरुणीच्या प्रायव्हेट भागावर दारू ओतून खायला घातली मिरची पूड, केले ब्लेडने सपासप वार; भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे निगडी परिसरात खळबळ

Shrikant Eknath Shinde | खासदार श्रीकांत शिंदेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार?, राष्ट्रवादीकडून ‘तो’ फोटो ट्विट करत केले गंभीर आरोप