Pune Crime | येणार्‍या जाणार्‍यांना लुटणार्‍या सराईत गुन्हेगाराला तरुणाने दिले पकडून; कोंढव्यातील घटना

पुणे : Pune Crime | मध्यरात्री येणार्‍या जाणार्‍याला अडवून त्यांच्यावर चाकूने वार करुन लुटणार्‍या सराईत गुन्हेगाराला (Criminal) तरुणाने धाडसाने पकडून दिले. ओमकार विष्णु रांजगे Omkar Vishnu Ranjage (वय २१, रा. माऊलीनगर, कात्रज) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. (Pune Crime)

याप्रकरणी रमेश शंकर डोणे Ramesh Shankar Donne (वय ४२, रा. शिवशंभोनगर, कात्रज कोंढवा रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०८८/२२) दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील व्हीआयआयटी कॉलेजसमोरील (VIIT College, Kondhwa) स्काय पार्क सोसायटीजवळ मंगळवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार रांजगे व त्याच्या साथीदाराने कोंढवा येथे मध्यरात्रीच्या सुमारास
नागेंद्र मारुती मोरे Nagendra Maruti More (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) यांना अडवून त्यांच्या हातावर चाकूने वार करुन त्यांच्याकडील २० हजार रुपयांची रोकड व मोबाईल जबरदस्तीने लुटला होता.
फिर्यादी हे मोटारसायकलवरुन जात असताना त्यांनाही ओमकार रांजगे याने मोटारसायकल आडवी लावून थांबविले.
त्याच्या उजव्या हातावर चाकूने वार केला. त्याच्या साथीदाराने फिर्यादी यांच्या पँटच्या खिशातील ७०० रुपये
जबरदस्तीने काढून घेतले. हाताला जखम झाली असतानाही रमेश डोणे यांनी ओमकार रांजगे याला पकडून ठेवून
आरडाओरडा केला. लोकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर (Assistant Police Inspector Usgaonkar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | A young man caught betraying a criminal in an inn who was robbing passers-by; Incident in Kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 12 लाखांची फसवणुक; सांगलीच्या मिलिंद गाढवे आणि निगडीतील अजय इंगळेवर FIR

Qala Movie | बहुचर्चित काला चित्रपटाची रिलीज डेट जाहिर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Balasaheb Thorat | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार?, बाळासाहेब थोरात म्हणाले…