×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | नियोजित पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाचे अपहरण करुन केली बेदम...

Pune Crime | नियोजित पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाचे अपहरण करुन केली बेदम मारहाण; सिंहगड रोड पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime |परवानगीशिवाय नियोजित पत्नीला भेटायला आल्याने तिच्या भावाने इतरांच्या मदतीने तरुणाचे अपहरण करुन त्याला जंगलात नेले व त्याला बेदम मारहाण करुन बहिणीला भेटल्यास तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४१७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. ही घटना वडगाव येथील जाधवनगर व कुडजे गावाच्या पुढे जंगलात २४ सप्टेबर रोजी मध्यरात्री घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथे राहतो.
त्याचे धायरी येथील एका तरुणीबरोबर विवाह निश्चित झाला आहे.
तो वडगाव येथील जाधवनगरमध्ये आपल्या होणार्‍या पत्नीला भेटायला गेला होता.
त्यावेळी आपल्या परवानगीशिवाय बहिणीला भेटायला आला याचा तिच्या भावाला राग आला.
त्याने आपली बहीण व फिर्यादी यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून कुडजे गावाच्या पुढे जंगलात घेऊन गेला.
तेथे त्याने कंबरेच्या बेल्टने, दगडाने व लाकडी बांबुने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.
परत आमच्या बहिणीला भेटलास तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.
त्यानंतर आता या तरुणाने फिर्याद दिली असून सिंहगड रोड पोलिसांनी फिर्यादी याची होणाऱ्या पत्नीचा भाऊ व
त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक निकम (API Nikam) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A young man who came to meet his intended wife was kidnapped and brutally beaten; FIR in Sinhagad Road Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | पीएफआयवर बंदी घालणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना

CM Eknath Shinde | ‘मिशन’ सोपे नव्हते, फडणवीसांना प्रत्यक्ष भेटायचो, दूरध्वनीवरून बोलणे शक्यच नव्हते, कारण आमचे दूरध्वनी टॅप…, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या आठवणी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News