CM Eknath Shinde | ‘मिशन’ सोपे नव्हते, फडणवीसांना प्रत्यक्ष भेटायचो, दूरध्वनीवरून बोलणे शक्यच नव्हते, कारण आमचे दूरध्वनी टॅप…, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या आठवणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सध्या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे, आपण बंडखोरी का केली, आणि कशी केली याच्या सुरस कथा सातत्याने मांडत आहेत. आज त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा, आपण रात्री-अपरात्री फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) बैठका कशा घेतल्या, बंडाचा कट कसा शिजवला आणि कशा अडचणी आल्या हे सांगितले. यावेळी, फडणवीसांऐवजी त्यांना मुख्यमंत्रीपद कसे मिळाले, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सांगितले.

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, हा सगळा सत्ताबदलाचा कार्यक्रम मी मुख्यमंत्रीपदासाठी केलाच नव्हता. मित्रपक्षांच्या कारवायांमुळे शिवसेनेचे (Shivsena) आमदार त्रस्त झाले होते. मतदारसंघात मित्रपक्षाकडून नारळ वाढविण्यात येत होते. यामुळेच आमदार बिथरले होते. पोलिसांच्या खोट्या केसेस, तडीपारी हे सारे सुरू झाले होते.

 

एकाला तर काहीही कारण नसताना मोक्का लावण्यात आला. हे अतिच झाले होते. मी हे सारे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले होते. माझ्या खात्याच्या बाबतीत असेच घडत होते. पण मी त्यांना पुरून उरायचो. त्यांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्यक्रम करून टाकायचो.

शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, भाजपासोबत (BJP) युती केली तर आपल्या मुख्यमंत्रीपदाचे काय होणार? या भीतीमुळेच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) युती केली नाही. आमदारांमधील नाराजी वाढत होती. त्यांचा कडेलोट व्हायचा. भाजपबरोबर युती करू या म्हणून मी चार ते पाच वेळा शिवसेना नेतृत्वाला भेटलो. सर्वांच्या भावना कानावर घातल्या.

 

भाजपबरोबर युती केल्यास माझ्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचे काय हा प्रश्न त्यांना होता.
कारण भाजपबरोबर युती केली असती तर मुख्यमंत्रीपदाला ‘ब्रेक’ लागला असता.
ते त्यांना मान्य नव्हते. शेवटी आमदारांचा एवढा कडेलोट झाला होता की माझाही नाईलाज झाला.

 

बंडखोरीच्या काळाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तो सारा काळ वेगळाच होता. आम्ही सत्ताधारी होतो.
सारा फोकस आमच्यावर असायचा. अशा परिस्थितीत ‘मिशन’ किंवा ‘ऑपरेशन’ सोपे नव्हते.
पण आम्ही भेटायचो, बोलायचो. बोलल्याशिवाय कसे होणार? प्रत्यक्ष भेटी वारंवार व्हायच्या.
सातार्‍याला ते कधीच भेटायला आले नव्हते. दूरध्वनीवरून बोलणे शक्यच नव्हते. कारण आमचे दूरध्वनी टॅप होत असत.

 

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde meetings with devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

CM Eknath Shinde | ते बंड फसले कारण त्यावेळी अजित पवार होते, यावेळी…, एकनाथ शिंदे यांनी सांगितला फरक

Ashish Shelar | भाजपाच्या शेलारांचा शिवसेनेला सवाल, पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत; कुठल्या बिळात बसलात?