Pune Crime | 31 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपींना अंतरिम जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कॅनटीन चालवण्यास देतो असे सांगून 31 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) केली. तसेच पैशांची मागणी केली असता जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) सुनील जोधासिंग भदोरीया Sunil Jodha Singh Bhadoria (वय-48) आणि अनीश भदोरीया Anish Bhadoria (दोघे रा. विश्रांतवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. बी. शिरसाळकर (Sessions Judge H.B. Shirsalkar) यांनी सशर्त अंतरिम जामीन मंजूर केल्याची माहिती आरोपींचे वकील ॲड. सिद्धांत मालेगांवकर (Adv. Siddhant Malegaonkar) यांनी दिली.

आरोपींच्या वतीने व्यक्तिवाद करताना ॲड. मालेगांवकर यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींना खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप हे खोटे असून त्यांनी अशा प्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच त्यांच्यावर लावलेले फसवणुकीचे आरोप हे निराधार असून तक्रारदाराने दिलेली रक्कम ही आरोपींना कॅन्टीन व्यवसायात भागीदारी ठेव (Partnership Deposit) व भाडे म्हणून दिलेली होती. तर इतरची रक्कम 13 लाख ही तक्रारदार यांनी नाही तर त्यांच्या मित्राने आरोपींना दिली होती. (Pune Crime)

दोन्ही पक्षकारांमधील वाद दिवाणी स्वरुपाचा असल्याचे दिसून येते आणि एफआयआर मधील आरोप लक्षात घेता आयपीसी कलम 506 अंतर्गत गुन्हा जामीनपात्र (Bailable) आहे. तसेच आरोपींची कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नाही. अंतरिम अटकपूर्व जामिनाला (Conditional Interim Bail Granted) परवानगी देण्यासाठी हे योग्य असून दोन्ही आरोपींना अंतरिम जामीन मंजूर करावा अशी विनंती ॲड. मालेगांवकर यांनी न्यायालयाला केली.

न्यायालयासमोर ठेवण्यात आलेल्या पुराव्याच्या विचार करुन ॲड. मालेगांवकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन
आरोपींना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. या प्रकरणातील आरोपींच्या वतीने ॲड. सिद्धांत मालेगांवकर,
ॲड. प्रमोद धुळे (Adv. Pramod Dhule), ॲड. कुणाल पगार (Adv. Kunal Pagar), ॲड. वैष्णवी पवार
(Adv. Vaishnavi Pawar), अमोल घावटे (Amol Ghawte) यांनी काम पाहिले.

Web Title :- Pune Crime | Accused granted interim bail in Rs 31 lakh fraud case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update