Pune Crime Branch Police | गुन्हे शाखेकडून परराज्यातील तीन नागरिकांना अटक, 3 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime Branch Police | गांजा, चरस, हशिश तेल असे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थांची (Drugs) विक्री करणाऱ्या तीन परप्रांतिय नागरिकांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक (Crime Branch Anti-Drug Squad) एकने ही कारवाई केली असून आरोपींकडून 3 लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नासिर नुरअहमद शेख (वय-30 रा. अमित अस्ट्रोनिया क्लासिक सोसायटी, वडाची वाडी,
उंड्री मुळ रा. मडगाव गोवा), पुनित सतबीर कादयान (वय-35 रा. व्यंकटेशभुमी ब्लिस सोसायटी,
उंड्री मुळ रा. बेरी, हरियाना), शरत विजयन नायर (वय-34 रा. रा. व्यंकटेशभुमी ब्लिस सोसायटी,
मूळ रा. कृष्णानगर, चेन्नई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सोमवारी (दि.16) हद्दीत गस्त घालत होते. पथकातील पोलीस शिपाई योगेश मोहिते Yogesh Mohite यांना माहिती मिळाली की तीन परप्रांतीय लोक राहत्या घरामध्ये चरस गांजा व इतर अंमली पदार्थाची विक्री करत आहेत.
मिळालेल्या पथकाने पंचासह त्या ठिकाणी जाऊन छापा मारला.

आरोपी नासिर याच्या घरातून 1 किलो 600 गांजा, 03 ग्रॅम 100 मिली हशिश तेल (hashish oil),
मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा जप्त केला.
तर पुनित कादयान व शरत नायर यांच्या घरातून 3 किलो 500 ग्रॅम गांजा व 15 ग्रॅम 170 मिली ग्रॅम चरस (charas), मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा, रोख रक्कम 1 लाख 67 हजार असा एकूण 3 लाख 23 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Pune Jt. CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे
(Addl CP Ashok Morale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सुरेंद्रकुमार देशमुख (ACP Surendra Deshmukh) यांच्या
मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी पथक 1 चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad) , सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर,
संदिप जाधव, राहुल जोशी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे,
रेहना शेख, नितीन जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

 

Web Title : Pune Crime Branch Police | Crime Branch arrests three foreign nationals, seizes drugs worth Rs 3 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Former Minister Sanjay Rathod | ‘त्या’ महिलेच्या आरोपांबाबत पोलीस नोंदवणार आता माजी वनमंत्री संजय राठोड यांचा जबाब

Neeraj Chopra | मायदेशी परतताच गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

OBC Political Reservation | ओबीसी आरक्षणावरुन शरद पवारांनी केंद्रावर खापर फोडले नाही, फडणवीसांनी साधला राज्य सरकारवर निशाणा (व्हिडिओ)