Pune Crime | पीएमटी बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारा चोरटा गजाआड, 4 गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यात (Pune Crime) पीएमटी बस मधून (PMT bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावण्याचे (Mobile thief) प्रकार वाढत असून अशाच एका चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden police) सिनेस्टाईल पाठलाग करुन बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने मोबाईल चोरीचे 4 गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. शंकर हनुमंत गायकवाड (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव (Pune Crime) आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.19) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास एक तरुणी पीएमटी बसने प्रवास करत होती. बस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्टॉपवर थांबली असता चोरट्याने तिच्या हातून मोबाईल हिसकावून पळून गेला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर पीएमटी सुरक्षा रक्षक (PMT security guard) तसेच बंडगार्ड पोलीस ठाण्यातील (Bundguard Police Station) तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, अंमलदार प्रताप गायकवाड, अनिल कुसाळकर, सागर घोरपडे यांनी चोरट्याचा पाठलाग केला. आरोपीला चोरीच्या मोबाईलसह ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीत बंडगार्डन आणि लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या (Lonikalbhor police station) हद्दीत प्रत्येकी दोन असे एकूण 4 गुन्हे (Pune Crime) उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil) , सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे (ACP Chandrakant Sangale),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी (Senior Inspector of Police Yashwant Gawri), पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल पवार (PSI Rahul Pawar), सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन काळे, पोलीस अंमलदार हरिष मोरे,
प्रताप गायकवाड, अनिल कुसाळकर, सागर घोरपडे, गौरव उभे, पाडुरंग कांबळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | bundgarden police arrest mobile thief who theft mobiles from pmt bus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Weight Loss Winters | हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी सेवन करा ‘या’ 5 गोष्टी, वाढणारे पोट राहिल नियंत्रणात

TET Exam 2021 | TET परीक्षेस 90 टक्के उमेदवारांची उपस्थिती; 8 हजार विद्यार्थी ‘डुप्लिकेट’?

MLA Gopichand Padalkar | पडळकरांचा अनिल परबांना सवाल; म्हणाले – ‘आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?’