Pune Crime | मित्राला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, खुनाच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खूनासह (Murder) खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) करीत दोन गुन्ह्यात फरार असलेल्या सराईताला दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) अटक केली आहे. तो मित्राला भेटायला दांडेकर पूल (Dandekar Bridge) परिसरात आला होता. नेमके त्याच वेळी पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या (Pune Crime) आवळल्या आहेत. प्रविण ऊर्फ घाऱ्या चंद्रकांत खांबे Pravin alias Gharya Chandrakant Khambey (रा. दांडेकर पुल) असे अटक (Arrest) केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

सिंहगड पोलिस ठाण्याच्या (Sinhagad Police Station) हद्दीतील खून प्रकरणातील सराईत आरोपी मित्राला भेटण्यासाठी दांडेकर पुल परिसरात आल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे (Police Constables Kundan Shinde), अमित सुर्वे (Amit Surve) व प्रशांत शिंदे (Prashant Shinde) यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रवीण खांबे याला ताब्यात घेत अटक केले. त्याने ९ ऑक्टोबरला कृष्णकुमार चांदणे (Krishna Kumar Chandane) याला साथीदारांच्या मदतीने मारहाण करून जखमी केल्याची कबुली दिली.

ही कारवाई ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड
(DCP Pournima Gaikwad), सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार
(Sinhagad Road Division ACP Sunil Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomane) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe), सुनिल जगदाळे (PSI Sunil Jagdale),
कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, प्रशांत शिंदे, सद्दाम शेख, नवनाथ भोसले, श्रीकांत शिंदे, किशोर वळे,
दयानंद तेलंगे पाटील, अमोल दबडे, अमित चिव्हे, प्रमोद भोसले, अनिस तांबोळी यांनी केली.

मित्राला भेटायला आला अन् अडकला

आरोपी प्रविण ऊर्फ घाऱ्या खांबे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वीही 2014 मध्ये वडगाव भागात एकाचे अपहरण (Kidnapping) करुन भोर वरंधा घाट येथे खून केल्याचा गुन्हा दाखल आहे.
गुन्हा केल्यापासुन तो मुळ गावी महाड येथे लपुन बसला होता.
पुण्यात मित्राला भेटायला आल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी उपनिरीक्षक सुनिल जगदाळे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Came to meet a friend and got caught in the police net, Datwadi Police handcuffed the absconding inn accused of murder.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | मंत्री अर्वाच्च भाषेत अधिकार्‍यांशी बोलतात, बाप काढतात, ही संस्कृती? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?, अजित पवारांचा परखड सवाल (व्हिडिओ)

State Government Employees | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, दिवाळीपूर्वीच मिळणार महिन्याचा संपूर्ण पगार