Pune Crime | हडपसर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकाला न्यायालयाचा दणका, कारणे दाखवा नोटीस; जाणून घ्या प्रकरण

पुणे – Pune Crime | लष्कर न्यायालयाने (Cantonment Court Pune) आदेश दिल्यानंतरही बलात्कारासारखा (Rape Case) गंभीर गुन्हा दाखल करून न घेता महिलेला माघारी पाठवणार्‍या हडपसर पोलिसांना (Hadapsar Police) लष्कर न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना (Senior Police Inspector) कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावली आहे. (Pune Crime)

पिडीत महिलेने विशाल सुरज सोनकर Vishal Suraj Sonkar (रा. वानवडी – Wanwadi) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) संशयीत आरोपीने बलात्कार केल्याचे व अनैसर्गिक कृत्य (Unnatural act) तसेच तिची आर्थिक फसवणूक (Cheating Case) केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. तिचे फोटो नातेवाईकांना पाठविले होते. त्यानुसार लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील (Cantonment Court First Class Magistrate D. J. Patil) यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
त्यानंतर तक्रारदार महिला हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) गेली असता न्यायालयाचा आदेशाची प्रत पोलिसांना दिली.
याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. न्यायालयाने 156 (3) च्या अर्जावर दि. 6 ऑक्टोबरला आदेश दिले होते. न्यायालयाचे आदेश असतानाही गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याप्रकरणात अ‍ॅड. शाह यांनी पुन्हा न्यायालयाकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार न घेतल्याने आम्ही न्यायालयात 156 (3) नुसार अर्ज करून याप्रकरणात
बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, अपहार, फसवणूक यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही अशीलाचा गुन्हा दाखल करून
घेण्यात आला नाही. त्यावर आता आम्ही कन्टेम्प्ट ऑफ कोर्टसाठी अर्ज दाखल केला होता.
त्यावर लष्कर न्यायालयाने हडपसर पोलिस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

– अ‍ॅड. साजिद शाह (Adv. Sajid Shah)
(तक्रारदार महिलेचे वकील)

Web Title :- Pune Crime | Cantonment Court Pune Issue Show Cause Notice To Senior Police Inspector Of Hadapsar Police Station For Contempt of Court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा