Pune Crime | कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 26 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील औंध (Aundh) बाणेर (Baner) परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या कल्याण मटका व सोरट जुगार अड्ड्यावर (Matka Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टकला. या कारवाई 26 जणांवर कारवाई करुन 25 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 2 लाख 01 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

औंध बाणेर लिंक रोड परिसरात काही जण अवैधपणे मटका व सोरट जुगार पैसे लावुन खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवुन छापा टकाला असता कल्याण मटका व सोरट जुगार पैसे लावून खेळवत व खेळत असलेल्या 25 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. (Pune Crime)

ताब्यात घेण्यात आलेल्या 25 जणांविरुद्ध आणि जुगार अड्ड्याच्या मालकाविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chatushringi Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींना पुढील कारवाईसाठी चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके
(PSI Shridhar Khadke), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने, संदीप कोळगे,
हनमंत कांबळे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :-  Pune Crime | Crime branch raided Kalyan Matka gambling den in Aundh area, action taken against 26 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी 55 पैकी 40 आमदार आमच्यासोबत : एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली आपली ताकद

Maharashtra Police | पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारकडून ‘दसऱ्या’ची भेट, नैमित्तिक रजेत भरघोस वाढ; जीआर निघाला