Pune Crime | निकृष्ट बांधकाम करुन पोलिसाच्या पैशाचा अपहार करणार्‍या विनायक डेव्हलपर्सच्या विनायक शिरोळे, अविनाश शिरोळे, निखील शिरोळे, सचिन जगताप यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कराराप्रमाणे बांधकाम न करता हलक्या व निकृष्ट पद्धतीने काम करुन इमारतीचे लिफ्ट, रंगकाम, लाईट, येण्या जाण्याचा रोड अशी कामे अपूर्ण ठेवून पोलिसाच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी विनायक डेव्हलपर्सच्या (Vinayak Developers) संचालकांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti vidyapeeth police station ) गुन्हा दाखल केला आहे. विनायक डेव्हलपर्सचे विनायक शिरोळे (Vinayak Shirole), अविनाश शिरोळे (Avinash Shirole), निखील शिरोळे (Nikhil Shirole), सचिन जगताप (Sachin Jagtap) अशी गुन्हा दाखल (Pune Crime) झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१९ दरम्यान घडला.

या प्रकरणी दिनकर बबन हनमघर Dinkar Baban Hanamghar (वय ४५, रा. सिद्धीविनायक सोसायटी, दत्तनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धीविनायक सोसायटीमधील विनायक रेसिडेन्सीमधील फ्लॅट पसंद पडल्याने आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन फ्लॅट बुक केल्यानंतर तुम्हास एक वर्षाच्या आत ताबा मिळेल. सर्व अ‍ॅमेनेटी मिळेल असे सांगून फ्लॅटची किंमत १४ लाख ५० हजार रुपये ठरविली. त्यानुसार फिर्यादी यांनी ९ लाख ४० हजार रुपये दिले.
परंतु, आरोपींनी बिल्डींगचे काम हलक्या व निकृष्ट पद्धतीने केले होते. बिल्डरने फिर्यादीस राहिलेले काम तुम्ही तुमच्या खर्चाने करुन घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी ४ लाख ७० हजार रुपये खर्च करुन काम करुन घेतले.फिर्यादी हे पोलिस दलात कार्यरत आहेत. (Pune Crime)

आरोपींनी बिल्डींगचे लिफ्ट, रंगकाम, लाईट, येण्या जाण्याचा रोड याची कामे अपूर्ण ठेवले असून काम करुन देण्यास टाळाटाळ करत आहे. आरोपीने पालिकेचे नकाशाप्रमाणे बांधकाम न करता सहकारी सोसायटी न नोंदवता इमारत सोसायटीस हस्तांतरीत केली असून काम अपूर्ण ठेवून पैशांचा अपहार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

Web Title :Pune Crime | Crime Registered against Vinayak Developers
Director Vinayak Shirole, Avinash Shirole, Nikhil Shirole,
Sachin Jagtap in bharti vidyapeeth police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या