Pune Crime | एसटी प्रवासी नियंत्रकाला एजंटकडून जीवे मारण्याची धमकी, स्वारगेट एसटी स्थानकातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खासगी प्रवासी वाहतूक एजंटापासून (Private Passenger Agent)  सावध रहा, असे म्हणल्याचा राग आल्यामुळे चौघांनी एसटी प्रवासी नियंत्रकाच्या (ST Passenger Controller) केबीनमध्ये शिरून जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. ही घटना 23 ऑक्टोबरला सकाळी साडेअकराच्या (Pune Crime) सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात (Swargate ST Station) घडली.

 

किशोर नागटिळक, विशाल राठी, पवार, कुमार निकंब अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नामदेव बाळासाहेब कारले Namdev Balasaheb Karle (वय 52, रा.  कात्रज) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात (Swargate Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव हे एसटी महामंडळात कार्यरत असून 23 ऑक्टोबरला ते स्वारगेट स्थानकात प्रवाशांना सूचना देत होते.
खिसेकापू, पिशव्या उचलणाऱ्यांपासून सावध रहा, खासगी प्रवाशी वाहतूक एजंटापासून  सावध रहा, अशा सूचना देत होते.
त्याचा राग आल्यामुळे खासगी  प्रवाशी वाहतूक करणारे एजंट नागटिळक, राठी, पवार आणि निकंब यांनी नामदेव यांना दमदाटी केली.
त्याशिवाय त्यांना आणि वरिष्ठ अधिकारी जाधव यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जगताप (PSI Jagtap) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Death threat to ST passenger controller by agent,
incident at Swargate ST station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा