Pune Crime | पुण्यात खळबळ! 57 वर्षीय ACP ने 44 वर्षीय पत्नी आणि 35 वर्षीय पुतण्याची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतः केली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात एक खळबजनक घटना (Pune Crime) घडली असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बाणेर मध्ये ACP ने 44 वर्षीय पत्नी आणि 35 वर्षीय पुतण्याची हत्या (Murder) करुन स्वतःला संपवले आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस (Amravati Police) दलात कार्यरत असलेल्या या ACP ने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या (Suicide) केली. याबाबत माहिती कळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

पत्नी मोनी भारत गायकवाड Moni Bharat Gaikwad (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड Deepak Gaikwad (वय 35) अशी गोळी झाडून खून (Pune Crime) झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ACP भारत गायकवाड (ACP Bharat Gaikwad) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त (Assistant Commissioner of Police) म्हणून कार्यरत होते.
त्यांचे कुटुंबीय पुण्यात बाणेर बालेवाडी परिसरात वास्तव्याला होते.
हत्येनंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून चतु:शृंगी पोलीस (Chathushringi Police Station)
घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

24 July Rashifal : कर्क, सिंह आणि कन्या राशीवाल्यांना होईल मोठा लाभ, वाचा दैनिक राशिफळ