Pune Crime | दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार्‍यांचे मोबाईल चोरणारी आंध्र प्रदेशातील महिलांची टोळी जेरबंद

पुणे : Pune Crime | गणेशोत्सवात (Ganeshotsav 2022) श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे (Dagdusheth Halwai Ganpati) दर्शन घेण्यासाठी सर्वाधिक गर्दी होत असते.
या गर्दीचा गैरफायदा घेऊन पाकीटमारी, मोबाईल चोरी (Mobile Theft) करणार्‍या एका आंध्र प्रदेशाच्या (Andhra Pradesh) महिलांच्या टोळीला पोलिसांनी (Pune Police) पकडले आहे. (Pune Crime)

आगुराम्मा गिड्डीआण्णा गुंजा Aguramma Giddianna Gunja (वय ३५), आमुल्ला आप्पुतोलाप्रभाकर कंप्परिलाथिप्पा Amulla Apputolaprabhakar Kampparilathippa (वय ३७), अनिता पिटला सुधाकर Anita Pitla Sudhakar (वय २१), सुशिला इसाम तंपीचेट्टी Sushila Isam Tampichetti (वय ३५, सर्व रा. आंध्र प्रदेश) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याप्रकरणी एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४०/२२) दिली आहे. फिर्यादी या दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या.
यावेळी मंडपात मोठी गर्दी झाली होती.
गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील ४० हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेत होत्या.
हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला.
तेव्हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या सर्व महिलांना ताब्यात घेतले.

तसेच दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत असताना एका तरुणाच्या पँटच्या खिशातून २ हजार रुपयांची रक्कम चोरत असताना संदीप सुनिल बोरसे Sandeep Sunil Borse (वय २७, रा. धुळे) या चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.

Web Title :- Pune Crime | Gang of women in Andhra Pradesh jailed for stealing cellphones from Dagdusheth Halwai Ganapati darshan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीवर कारवाई; पबवर छापा टाकून गुन्हे शाखेची कारवाई

PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन