Pune Crime | भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीवर कारवाई; पबवर छापा टाकून गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : Pune Crime | भारत-पाकिस्तान (India-Pakistan Cricket Match) या हाय होल्टेज क्रिकेट सामन्यावर पबमध्ये बसून बेटिंग (Betting) घेणार्‍या बुकीला गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) रविवारी रात्री उशिरा छापा टाकून ताब्यात घेतले. श्रीपाद यादव (Shripad Yadav) असे या बुकीचे नाव आहे. (Pune Crime)

श्रीपाद यादव हा यापूर्वी पिंपरी चिंचवडमधून बेटिंगचा धंदा करत होता. गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) आयपीएलवर बेटिंग घेत असताना त्याला अटक (Arrest) केली होती. त्यानंतर त्याने आपला कारभार पुण्यात हलविला होता.

शहरातील मध्य वस्तीतील डी -मोरा पबमध्ये (De-Mora Pub) भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेतले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानुसार पथकाने रविवारी रात्री उशिरा सामना सुरु असताना पबवर छापा टाकला.
त्यात श्रीपाद यादव याला ताब्यात घेण्यात आले असून रोकड, मोबाईल व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.