Pune Crime | फसवणुकीच्या गुन्ह्यात कपील धिंग्रा आणि त्यांच्या पत्नीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फसवणुक केल्या प्रकरणी (Fraud Case) कपील जगमोहन धिंग्रा (Kapil Jagmohan Dhingra) आणि त्यांची पत्नी गौरी कपील धिंग्रा (Gauri Kapil Dhingra) यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला (Pune Crime) आहे. या गुन्ह्यात धिंक्रा दाम्पत्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे.एन. राजे (Additional Sessions Judge J.N.Raje) यांनी सशर्त अंतिम जामीन मंजूर (Bail Granted) केला असल्याची माहिती ॲड. सिद्धांत मालेगांवकर (Adv. Siddhant Malegaonkar) यांनी दिली.

या गुन्ह्यात आरोपी धिंग्रा यांनी ॲड. सिद्धांत मालेगांवकर यांच्या मार्फत न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकीलांनी (Public Prosecutors) धिंग्रा दाम्पत्याच्या जामीन मंजुरीला तीव्र विरोध केला. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, दोन्ही आरोपी हे या गुन्ह्यामध्ये सहभागी असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच आरोपी कपील धिंग्रा यांच्या विरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) आणखी एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करु नये असा युक्तिवाद केला. (Pune Crime)

आरोपींच्या वतीने ॲड. सिद्धांत मालेगांवकर यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आरोपी यांना या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून त्यांनी अशा प्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नाही. याशिवाय त्यांच्यावर लावलेले फसवणुकीचे आरोप हे निराधार असून त्यांनी व्यवसायासाठी घेतलेली रक्कम वेळोवेळी परत केली आहे. तसेच आरोपींकडून कोणत्याही प्रकारची जप्ती नाही, कारण संपूर्ण पुरावा हा कागदोपत्री पुरावा असून त्यासाठी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आरोपींना अंतिम जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद ॲड. मालेगांवकर यांनी केला.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे.एन. राजे यांनी कपिल धिंग्रा आणि गौरी धिंग्रा यांना
सशर्त अंतिम जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने ॲड. सिद्धांत मालेगावकर, ॲड. प्रमोद धुळे
(Adv. Pramod Dhule), ॲड. कुणार पगार (Adv. Kunar Pagar) व ॲड. वैष्णवी पवार
(Adv. Vaishnavi Pawar) यांनी काम पाहिले.

Web Title :- Pune Crime | Kapil Dhingra and his wife granted bail in fraud case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या विश्वासू सहकार्‍याची भाजपाशी सलगी, नार्वेकर म्हणतात, ‘अमित शाहजी देव करो तुम्हाला…’

Rain in Maharashtra | दिवाळीवर पावसाचे सावट; परतीचा पाऊस लांबला