Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना लोणीकंद पोलिसांकडून 48 तासात अटक, खुनाचे कारण आलं समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दारु पिताना झालेल्या वादातून तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून (Murder In Pune) केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात मंगळवारी (दि.22) रात्री पावणे बाराच्या सुमारास सिट्रोन सोसायटीच्या समोर घडली होती. या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) 48 तासात अटक केली आहे.

शैलेश उर्फ शैलेंद्र मंडगीकर (वय-22 रा. लेबर कॅम्प, केसनंद रोड, वाघोली, मुळ रा. मंडगी, पो. नरंगल बुद्रुक, ता. देगलुर, जि. नांदेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राम सुभाष श्रीराम/श्रीरामे (वय-22 रा. मुपो बेरळी बुद्रुक, ता. मुखेड जि. नांदेड) व गोपाल ज्ञानोबा कोतलापुरे (वय-26 रा. नांदेड नाका, महादेवनगर, जि. लातुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे. आरोपी आणि मयत यांच्यामध्ये काम केल्याचे पैसे देण्यावरुन वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी शैलेश याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी गावी जाण्याची शक्यता असल्याने एक पथक नांदेडच्या दिशेने रवाना करण्यात आले. तर आरोपी तुळजापूर येथील एका नातेवाईकाकडे जाण्याची शक्यता गृहीत धरुन एक पथक तुळजापुर येथे पाठवण्यात आले. आरोपी राम श्रीराम/श्रीरामे हा तुळजापुर येथे येताच त्याला सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव (API Gajanan Jadhav), पोलीस नाईक विनायक साळवे, स्वप्निल जाधव यांनी ताब्यात घेतले.

आरोपीकडे चौकशी केली असता त्याचा दुसरा साथीदार गोपाल कोतलापुरे हा लातुर येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीच्या मागावर दुसरे पथक रवाना करण्यात आले. मात्र, आरोपी वाघोलीला परत येत असल्याची माहिती पोलीस नाईक रितेश काळे यांना मिळाली. त्यानुसार पुण्यातील पथकाने आरोपीला चोखी ढाणी परिसरातून ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी 48 तासांच्या आत दोन गुन्हेगारांना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला. आरोपींना 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग
रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे,
सहयक पोलीस आयुक्त येरवडा विभाग (Yerwada Division) संजय पाटील (ACP Sanjay Patil),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (Senior PI Vishvajeet Kaingade),
पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील (PI Maruti Patil), पोलीस निरीक्षक गुन्हे सिमा ढाकणे (PI Sima Dhakane)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर (API Somnath Padsalkar),
आण्णासाहेब टापरे (API Annasaheb Tapre), निखिल पवार (API Nikhil Pawar),
पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे (PSI Rahul Kolpe), सुरज गोरे (PSI Suraj Gore), पोलीस अंमलदार
बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, रितेश काळे, सागर जगताप, मल्हारी सपुरे यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | आई पासून दुरावलेला 8 वर्षांचा मुलगा सोशल मीडियामुळे दोन तासात आईच्या कुशीत, मुंढवा पोलिसांची कामगिरी