Pune Crime News | ‘बेटर हाफ’ वेबसाईटवरून ओखळ झाल्यानंतर लग्नाच्या अमिषाने 28 वर्षीय तरूणीची 9 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘बेटर हाफ’ (betterhalf ai) वेबसाईटवरून ओळख झाल्यानंतर तरुणीला ‘मी इंटेलिजन्स ऑफिसर’ असून ‘युएस गव्हर्नमेंट’चा कर्मचारी असल्याची बतावणी करत लग्नाच्या आमिषाने 9 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी 28 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. यानुसार चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी फॅशन डिझायनर आहे. तरुणीने बेटर हाफ वेबसाईट (betterhalf ai) वर नाव नोंदणी केली होती. या वेबसाईटवरून आरोपीची ओळख झाली होती. त्यांच्यात बोलणे होत असत. त्याने बाणेर परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले दोघे भेटल्यानंतर त्याने पीडित तरुणीला मी इंटेलिजन्स ऑफिसर आहे. माझ्या अंडर दुबई, यु.एस. इंडिया हे देश येत असून, आम्ही एकूण 154 देश हँडल करतो. भारतात आम्ही व्यवसाय करण्यास आलो आहोत, अशी बतावणी त्याने केली होती. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले.

त्यानंतर या तरुणीला तुझ्यावर “रॉ”ची नजर आहे. यामुळे तरुणीचा मोबाईल, लॅपटॉप फॉर्मेट करण्यासाठी म्हणून स्वतःकडे घेतला. तसेच फिर्यादीला गुजरातमधील एका टेक्सटाईल मिल मधून कमी किमतीत कापड मिळवून देतो, असे सांगत त्याने वेळोवेळी बँक खात्यातील 8 लाख 37 हजार रुपये स्वतःच्या आणि इतर बँक खात्यात ट्रान्सफर केले. तसेच फिर्यादीचा 1 लाख 28 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप तिला परत न देता फसवणूक केली आहे. अधिक तपास चतुःशृंगी पोलीस (chaturshringi police) करत आहेत.

Web Title : Pune Crime News | 28-year-old girl cheated of Rs 9 lakh after knowing person via ‘BetterHalf’ website

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम