Pune Crime News | गुंतवणूकदारांची 300 कोटींची फसवणूक ! पुण्यातील अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट कंपनीतील तिघांना अटक; मुख्य सुत्रधार फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नागरिकांच्या नावावर विविध बँकांकडून कर्ज घेऊन कर्जाची रक्कम गुंतवल्यास जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने Economic Offence Wing Pune (EoW Pune) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट कंपनी (Ashtavinayak Investment Company) फायनान्स मॅनेजर, वित्तीय संस्थेचा अधिकृत डिएसए आणि कंपनीला आयटी कंपनीतील काम करणाऱ्यांची माहिती पुरवणाऱ्याचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.18) तिघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

फायनान्स मॅनेजर प्रसाद दिपक शिंदे Prasad Deepak Shinde (वय-30 रा. द्वारका धाम सोसायटी, कोंढवा बुद्रुक), अजय कैलास खडसे Ajay Kailas Khadse (वय-25 रा. अंवनी निलय बिल्डींग, शिक्रापुर), नितीन गजानन शिंदे Nitin Gajanan Shinde (वय-35 रा. नेताजीनगर सोसायटी, वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत सचिन पुरुषोत्तम पवार Sachin Purushottam Pawar (वय-38 रा. वाघोली, मुळ रा. चोपडा, जि. जळगाव) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह 200 जणांची तब्बल 300 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud Case) केली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला आहे. आरोपींनी फिर्यादी यांची 36 लाख 65 हजार 831 रुपयांची फसवणूक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट कंपनीचा संचालक आणि मुख्य आरोपी सेल्वा कुमार नडार (Selva Kumar Nadar) याच्या कार्यालयात काम करतात. आरोपींनी कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यावर मिळणाऱ्या नफ्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या नावावर ऑगस्ट 2020 मध्ये 6 वेगवेगळ्या बँकेतून 47 लाख 93 हजार 331 रुपयांचे पर्सनल लोन (Personal Loan) घेतले. कर्जाची रक्कम फिर्यादी यांच्या नावावर जमा झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 40 लाख 89 हजार 152 रुपये अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेव स्वरुपात गुंतवणूक करुन घेतली.

दरम्यान, 3 कर्ज खाती बंद करण्यासाठी पुन्हा बजाज फायनान्स (Bajaj Finance) कडून 15 लाख रुपये कर्ज घेऊन त्याची ठेव स्वरुपात गुंतवणूक करुन घेतली. आरोपींना डिसेंबर 2022 पर्यंत कर्जाच्या हप्त्याची पूर्ण रक्कम फिर्यादी यांना पाठवली. मात्र जानेवारी 2023 पासून थकीत कर्ज रक्कम 33 लाख 85 हजार 831 वरील कर्जाचा हप्ता भरला नाही. तसेच फिर्यादी यांनी अष्टविनायक कंपनीत सप्टेंबर 2020 ते डिसेंबर 2022 पर्य़ंत दरमहा 10 हजार प्रमाणे गुंतवलेले 2 लाख 80 हजार रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली.

आरोपींनी फिर्यादी यांच्यासह 16 कर्जदार,
गुंतवणुकदार यांची 7 कोटी 58 लाख 95 हजार 845 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
तसेच फिर्यादी यांच्याप्रमाणे सुमारे 200 कर्जदार,
गुंतवणुकदार यांची अंदाजे 300 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सेल्वा कुमार नडार हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

फिर्यादी सचिन पुरूशोत्तम पवार व इतर 214 जणांच्या वतीने
अ‍ॅड. मनिष निकम (Adv.Manish Nikam), अ‍ॅड. अभिजित डोईफोडे
(Adv. Abhijit Doiphode) अ‍ॅड. सतीश गोलांडे (Adv. Satish Golande) कामकाज पाहत आहेत.

ACB Trap News | अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे 2 कर्मचारी लाच घेताना
एसीबीच्या जाळ्यात