Pune Crime News | सीमाशुल्क विभागाने पकडलेला माल स्वस्तात देण्याचे आमिष, पुण्यातील व्यापाऱ्याची 66 कोटींची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम -Central Customs Department) जप्त केलेला माल स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखून पुण्यातील व्यापाऱ्याची (Merchant) तब्बल 66 कोटी 33 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील चार जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News) आरोपींनी अशाच प्रकारे इतर अनेक व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत सोहम इम्पेस प्रा. लि. चे (Soham Impace Pvt. Ltd.) दशरथ मच्छिंद्र कोकरे (Dashrath Machindra Kokre), वर्षा दशरथ कोकरे (Varsha Dashrath Kokre), महेश रामभाऊ बंडगर (Mahesh Rambhau Bandgar), सागर रामभाऊ बंडगर Sagar Rambhau Bandgar (सर्व रा. खारघर, नवी मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड (Market Yard) येथील एका व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात (Wholesale Market) सुपारी, काळी मिरीची निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीतील एकाने आरोपी कोकरे यांच्याशी ओळख करुन दिली. कोकरे कस्टम ने जप्त केलेला माल स्वस्तात मिळवून देतात. यामध्ये गुंतवणूक (Investment) केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले.

आरोपी कोकरे याने फिर्य़ादी यांची भेट घेतली. त्यांना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचा
(Central Government Health Department) बनावट ईमेल दाखवला.
फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून 66 कोटी 33 लाख रुपयांची गुंतवणूक केली.
गुंतवणूक केल्यानंतर फिर्यादी व्यापारी यांना कोणताही परतावा न देता आरपींनी फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे (Economic Offence Wing (EOW) सहायक पोलीस निरीक्षक रुगाईकर (API Rugaikar) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | “मराठा आरक्षण उद्धव ठाकरेंच्या निष्क्रियतेमुळे गेले” चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Maratha Reservation Protest | “रिक्षाभर पुरावे आम्ही सरकारला देण्यास तयार…” मनोज जरांगे यांचा दावा